पाकिस्तानातील लाहोर, कराचीसह १२ शहरात ५० ड्रोन हल्ले

0

लाहोर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचे वातावरण आहे. यातच गुरुवारी (दि. ८) सकाळपासूनचं पाकिस्तानातील १२ शहरांमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची माहिती आहे. गुरुवारी सकाळी लाहोरमध्ये स्फोट झाल्यानंतर कराचीमध्ये मोठा स्फोट झाल्याचा दावा केला जात आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर वाढत्या तणावादरम्यान ही घटना घडली आहे. पाकिस्तानमधील १२ शहरांमध्ये ५० ड्रोन हल्ले झाले. परंतु हे स्फोट कोणाकडून झाले, त्याची माहिती दिली गेली नाही.

पाकिस्तानमधील लाहोरमध्येही जोरदार बॉम्बस्फोट झाला होता. लाहोरमध्ये एकामागून एक तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. पण कराचीमध्ये एक स्फोट झाला आहे. कराचीमध्ये सायरन वाजत असल्याचे वृत्त आहे. आणि शहरातील अनेक भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रावळपिंडीत स्फोट झाला आहे. या ठिकाणी लष्करी मुख्यालय आणि नौदलाचा तळाजवळ स्फोट झाला.पाकिस्तानमधील १२ शहरात ड्रोन हल्ले झाले आहे. यामुळे पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम पूर्ण अपयशी ठरली आहे.

रावळपिंडीच्या लष्करी मुख्यालयात झालेल्या बॉम्बस्फोटनंतर मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ड्रोन स्फोटानंतर संपूर्ण भागात घबराट पसरली आहे. सैन्याने संपूर्ण भाग आपल्या ताब्यात घेतला आहे.स्फोटाच्या आवाजानंतर सायरन वाजू लागले. त्यानंतर नागरिक घराबाहेर आले. या घटनांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. स्थानिक रिपोर्टनुसार, ड्रोन हल्ल्यानंतर सियालकोट, कराची, लोहर विमानतळे बंद करण्यात आली आहे.

हे स्फोट रोखण्यात पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येते.विशेष म्हणजे, बुधवारी सभागृहात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानी हवाई दलाचे खूप कौतुक केले होते. शाहबाज म्हणाले होते की, पाकिस्तानी हवाई दल खंबीरपणे मैदानात उभे आहे. पंतप्रधानांच्या कौतुकानंतर लगेचच, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी हवाई दल प्रमुखांची भेट घेतली होती.

भारताने पाकिस्तानविरोधात ऑपेशन सिंदूर ही मोहीम राबवली होती. या मोहीमेत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आली. त्यात शंभरपेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले. त्याचा धसका पाकिस्तानमधील नागरिकांनी घेतला आहे. त्यात गुरुवारी(दि.८) साखळी बॉम्बस्फोट झाले. परंतु, हे स्फोट कुणा केले याासंदर्भात अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech