बुलढाणा : अंबुजा सिमेंट्स या कंपनीने बुलढाण्यातील एक बांधकाम कंत्राटदार अफसर खान यांच्या प्रगतीचा नुकताच गौरव केला आहे. ‘अंबुजा सिमेंट्स’च्या तांत्रिक सेवा पथकाने केलेल्या साइट-भेटी आणि मार्गदर्शन यांतून खान यांनी काँक्रीट हाताळणीपासून ते क्युरिंग प्रक्रियेपर्यंतचे प्रत्यक्ष काम अधिक व्यवस्थित, योग्य पद्धतीने कसे व्यवस्थापित करायचे हे शिकून घेतले.
याआधी बांधकाम पद्धतींची स्पष्ट माहिती नसल्यामुळे खान यांच्या प्रकल्पांमध्ये उशीर, तसेच गुणवत्ता-संबंधीच्या समस्या निर्माण होत असत. ‘अंबुजा सिमेंट्स’ने आपल्या प्रीमियम उत्पादनांसह तज्ज्ञ तांत्रिक सेवेद्वारे त्यांना योग्य दिशा दिली. अशा सुटसुटीत आणि सुधारित पद्धती वापरून पूर्ण केलेला खान यांचा ‘एसीटी’ (अंबुजा सर्टिफाईड टेक्नॉलॉजी) प्रकल्प हा मजबुती, दर्जेदार काम आणि कौशल्यासाठी विशेष ठरला. ग्राहकांसह स्थानिक बांधकाम व्यावसायिकांनीही त्याची प्रशंसा केली.
आज अफसर खान हे प्रत्येक प्रकल्पात केवळ अनुभव नव्हे, तर वैज्ञानिक पद्धती आणि तांत्रिक शिस्त घेऊन उतरतात. स्पष्ट तांत्रिक ज्ञान किती मोठा बदल घडवू शकते, हे त्यांच्या या वाटचालीतून दिसून येते. अशा प्रकारे व्यावसायिकांना सक्षम बनवण्यास अंबुजा सिमेंट्स कटिबद्ध आहे; कारण योग्य पद्धतीने बांधलेले बांधकामच खऱ्या अर्थाने चांगले बांधकाम असते.