शिवसेना उमेदवार प्रमिला पाटील, किरण भांगले यांचा सहभाग, विजय आपलाच होणार असा प्रमिला पाटील, किरण भांगले यांना विश्वास
कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ ची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. रॅली, प्रचार सभा तसेच नागरिकांशी थेट भेटीगाठी घेत उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचताना दिसत आहेत. अशातच प्रभाग क्र. ५ ड मधून शिवसेना–भाजप महायुतीच्या उमेदवार प्रमिला पाटील आणि किरण भांगले निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. एक महिला आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून पार्श्वभूमी असलेल्या उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात रविवारी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी प्रमिला पाटील यांनी विजय आमचाच होणार असा विश्वास व्यक्त केला.

तर प्रभाग क्र. ५ ब चे महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण भांगले एक सुशिक्षित उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांना मतदान जनजागृती करत आहेत. तसेच आज रविवारी भव्य असे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला वर्गासह अनेक तरुण-तरुणी बाईक रॅलीमधे उत्स्फूर्त सहभाग घेताना दिसले.