डोंबिवली : पंढरपूर-मंगळवेढा रस्त्यावर शरद नगर येथे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार भाविकांचा मृत्यू झाला असून ते कल्याण डोंबिवली व परळ विभागातील आहेत. देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांनी या अपघातात आपला जीव गमवला. मृतांमध्ये तीन महिला व एक मुलगा आहे. अपघातात सापडलेले बारा भाविक हे डोंबिवलीतून दोनच दिवसांपूर्वी सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर यात्रेसाठी गेले होते. महालक्ष्मी देवी आणि तुळजा भवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले होते. दरम्यान एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने गाडीला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की गाडी ट्रकसह सुमारे ३० फूट फरफटत गेली आणि पूर्णपणे चिरडली गेली. काही प्रवासी रस्त्यावर पडले, तर काही जण गाडीत अडकले. या दुर्दैवी घटनेत डोंबिवलीच्या चार भाविकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये एक १४ वर्षीय मुलगा आणि तीन महिलांचा समावेश आहे.
या भीषण अपघातात योगिनी केकाणे (डोंबिवली), सविता गुप्ता (डोंबिवली), सोनम अहिरे (कल्याण), आदित्य गुप्ता (परळ) या मृत असून जखमींमध्ये कविता तुडास्कर, सोनम गुप्ता, राजश्री कदम-सोनवणे, आरती गुप्ता, वेद गुप्ता, गणेश गुप्ता, रोहन केकाणे, अंजनी यादव आणि चालक नवनाथ हिडकिट्टी यांचा समावेश आहे. हा अपघात गाडी ओव्हरटेक करताना झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातात किरकोळ दुखापत केलेल्यांना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत. या अपघाताची बातमी पसरताच डोंबिवलीत शोककळा पसरली. आमदार राजेश मोर यांनी पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले.
एका नामांकित गारमेंट कंपनीमधील १३ कर्मचारी पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट तीर्थयात्रेसाठी गेले होते. दरम्यान मंगळवेढा आणि पंढरपूरच्या रस्त्यावर त्यांच्या क्रुझरला भरधाव कंटेनर ने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात डोंबिवलीतील सविता गुप्ता आणि योगिनी केकाणे, तसेच परेल येथील १४ वर्षीय आदित्य गुप्ता, कल्याणच्या सविता अहिरे हे चार जण जागीच ठार झाले. तर अपघातात जखमी सात जणांना मंगळवेढा मधील संजीवनी हॉस्पिटल तर दोघांना सोलापूर येथील सी एन एस या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक २२ चे नगरसेवक संदेश हरिश्चंद्र पाटील यांनी यांनी तात्काळ घटनास्थळी घाव घेतली.