ट्रम्प, मस्क आणि जेडी व्हान्स यांना अल कायदाची धमकी

0

वॉशिंगटन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर आले आहेत.अल कायदा या दहशतवादी संघटनेने अमेरिकेला खुली धमकी दिली आहे. ही धमकी स्वतः अल कायदाचा म्होरक्या साद बिन आतिफ याने दिली आहे. यावेळी त्याच्या निशाण्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपाध्यक्ष जेडी वेंस आणि उद्योजक एलन मस्क आहेत. त्याने यासाठी धमकी देणारा व्हिडिओ बनवला आहे दिली आहे. आपल्या व्हिडिओमध्ये अल-कायदाचा क्रूर कमांडर अमेरिकेतील मुस्लिम आणि आपल्या साथीदारांना सांगतो आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. वेंस आणि एलन मस्क जिथेही दिसतील, तिथे त्यांची हत्या केली जावी. हा दहशतवादी कमांडर स्पष्टपणे सांगतो आहे की अमेरिकेत मुस्लिमांची संख्या इतकी वाढली आहे की जर त्यांनी निर्धार केला, तर हे तिघेही जिवंत राहू शकणार नाहीत. यासोबतच तो इतर देशांतील मुस्लिमांनाही या युद्धात सहभागी होण्याचे आवाहन करतो आहे.

अल-अवलाकी आपल्या व्हिडिओमध्ये म्हणतो – “जे लोक पॅलेस्टिनियन लोकांवर अत्याचार करत आहेत, त्यांच्याविरुद्ध जिहाद करणे योग्य आहे.” अल-कायदाच्या या दहशतवादी कमांडरचे पूर्ण नाव साद मोहम्मद आतिफ ऊर्फ साद बिन आतिफ अल-अवलाकी आहे. तो अल-कायदाचा एक वरिष्ठ कमांडर आहे. अल-कायदाच्या आयोगाने १० मार्च २०२४ रोजी साद मोहम्मद आतिफ याला अल-कायदा अरेबियन पेनिनसुलाचा कमांडर नियुक्त केला होता. खालिद अल बात्रासीच्या अचानक मृत्यूनंतर त्याची ही नियुक्ती करण्यात आली होती. अमेरिकेने त्याच्यावर ६० लाख डॉलर्सचे बक्षीसही जाहीर केले आहे. आतिफच्या नेतृत्वाखाली अल कायदाने अमेरिकेत दहशतवादी हल्ल्याची योजना आखली आहे. अल कायदा अशा धमक्या तेव्हाच देतो जेव्हा त्याची तयारी पूर्ण होते किंवा पूर्ण होण्याच्या मार्गावर असते. या धमकीनंतर एफबीआय, सीआयए आणि होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंट हाय अलर्टवर आले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech