अमित शाह यांनी राष्ट्रीय आयईडी डेटा व्यवस्थापन प्रणालीचे केले उद्घाटन

0

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनएसजी) राष्ट्रीय आयईडी डेटा व्यवस्थापन प्रणालीचे (एनआयडीएमएस) दूरदृश्य प्रणाली द्वारे उद्घाटन केले. कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सहा वर्षांत विविध प्रकारचा डेटा तयार करण्याचे आणि त्याचे पद्धतशीरपणे संकलन करण्याचे महत्वाचे काम झाले आहे. ते म्हणाले की, देशात घडणाऱ्या सर्व प्रकारच्या दहशतवादी घटनांच्या तपासासाठी आणि त्यांच्या विविध पैलूंचे विश्लेषण करण्यासाठी येत्या काळात एनआयडीएमएस अत्यंत महत्त्वाचे ठरेल. तसेच, एनआयडीएमएस हे पुढील पिढीचे दहशतवादाविरोधातील सुरक्षा कवच बनेल.

शाह म्हणाले की, गृह मंत्रालयाने गेल्या काही वर्षांत विविध प्रकारचा डेटा तयार केला आहे, मात्र तो स्वतंत्र कप्या-कप्यात असून एकमेकांपासून वेगळा आहे. आता, आम्ही या सर्व डेटा स्त्रोतांना एकमेकांशी जोडण्याचा, आणि त्याच्या विश्लेषणासाठी एक प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सॉफ्टवेअर विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत. ते म्हणाले की, आज सुरु करण्यात आलेल्या एनआयडीएमएसमुळे या प्रक्रियेला गती मिळेल आणि देशाला दहशतवादापासून सुरक्षित बनवण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. अमित शाह म्हणाले की, आज सुरू होत असलेल्या एनआयडीएमएसमुळे राष्ट्रीय तपास यंत्रणा, देशभरातील दहशतवाद विरोधी पथके, राज्य पोलीस दल आणि सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना (सीएपीएफ) द्वि-मार्गी, सर्वसमावेशक, एकात्मिक आणि ऑनलाइन डेटा मंच उपलब्ध होईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech