खराब हवामानामुळे अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेचे प्रक्षेपण एक दिवस लांबणीवर

0

वॉशिंगटन : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेचे प्रक्षेपण पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. १० जून रोजी हे यान घेऊन रॉकेट अंतराळ स्टेशनाकडे झेपावणार होते.परंतू, खराब हवामानामुळे हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले असून आता ते ११ तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता झेपावणार आहे, अशी माहिती इस्रोने अध्यक्ष डॉ. व्ही. नारायणन यांनी दिली आहे. नासाच्या केनेडी स्पेस सेंटरच्या एलसी-३९ए लाँच पॅडवरून स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानाद्वारे हे सर्वजण अंतराळात जाणार होते. परंतू, खराब हवामानामुळे लाँचिंग टाळण्यात आले आहे. त्यामुळे आता अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेचे प्रक्षेपण येत्या ११ तारखेला सायंकाळी साडेपाच वाजता केले जाईल.

पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर भारतीय अंतराळवीर पाठवण्याची योजना आखण्यात आली आहे. भारताकडून हवाई दलाचे पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना संधी मिळाली आहे. त्यांच्यासोबत मिशन कमांडर पेगी व्हिटसन (अमेरिका), मिशन स्पेशालिस्ट टिबोर कापू (हंगेरी), पोलंडचे स्लाव्होस वुज्नान्स्की-विस्निव्स्की (मिशन स्पेशालिस्ट) हे तिघेजण अ‍ॅक्सिओम-४ या अंतराळ मोहिमेत सहभागी होणार आहेत. अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेतील क्रू आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जातील, जिथे ते प्रयोगशाळेत फिरतील आणि विज्ञान, पोहोच आणि व्यावसायिक प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या मोहिमा पार पाडतील.

हे अंतराळवीर तिथे ६० प्रयोग करणार आहेत. पैकी ७ प्रयोग हे इस्रोचे आहेत. हे अभियान १४ दिवसांचे असणार आहे. शुक्ला हे भारतीय हवाई दलातील (आयएएफ) पायलट आहेत आणि त्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) ऐतिहासिक गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांपैकी एक म्हणून निवडण्यात आले आहे. गगनयान हे भारताचे पहिले मानवी अंतराळ उड्डाण असणार आहे. शुक्ला यांना या अनुभवाचा गगनयान मोहिमेवेळी फायदा होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech