‘बिट्टू बॉस’ला अखेरचा निरोप; सरनाईक कुटुंबियांचा भावनिक उजाळा

0

ठाणे : सहा वर्षांपूर्वी पूर्वेशच्या वाढदिवसानिमित्त संजय गांधी नॅशनल पार्क येथून दत्तक घेतलेला बिबट्याचा बछडा ‘बिट्टू बॉस’ आज कायमचा निरोप देऊन गेला. या छोट्या जीवाच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. अशी भावना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.

प्रताप सरनाईक म्हणाले ‘बिट्टू बॉस’ हा केवळ एक प्राणी नव्हता, तर कुटुंबाचा जिव्हाळ्याचा सदस्य बनला होता. त्याच्या निरागस हालचाली, लाघवी स्वभाव आणि प्रेमळ वागणुकीने सर्वांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते. गेल्या सहा वर्षांत त्याने कुटुंबीयांशी एक अतूट नातं जोडले होते. आज त्याच्या जाण्याने घरातील प्रत्येक कोपऱ्यात त्याच्या आठवणी दाटून आल्या आहेत.

त्याच्यासोबत घालवलेले क्षण, त्याचा निरागसपणा आणि जिव्हाळा हे सर्व आता स्मरणरूपानेच उरले आहेत. आमच्या साठी ही अपूरणीय हानी असून, ‘बिट्टू बॉस’ची जागा कोणीच घेऊ शकणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली . “बिट्टू बॉस, तुझ्या आठवणी आमच्या हृदयात सदैव जिवंत राहतील. तुझ्या आत्म्यास शांती लाभो,” अशा भावनिक शब्दांत सरनाईक कुटुंबीयांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech