दोन्ही देशांनी तणाव कमी करावा – डोनाल्ड ट्रम्प

0

वॉशिंग्टन : भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लाँच केलं आहे. भारतानं जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला आहे. या ऑपरेशनअंतर्गत भारताच्या सैन्य दलांकडून पाकिस्तान आणि पाकव्यप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक करण्यात आले आहेत. ही कारवाई मध्यरात्री दीडच्या सुमारास करण्यात आली. बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबाद येथे स्ट्राइक करण्यात आले. यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानमध्ये भारताचे एअरस्ट्राईक इट इज शेम अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली आहे. दोन्ही देशांनी तणाव कमी करावा, असा आग्रह त्यांनी केला आहे.

ऑपरेशन सिंदूर बाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की मी याबाबत ऐकलेय, इट इज शेम, अपेक्षा आहे की हे लवकर समाप्त होईल. कोणत्याही दोन बलवान देशांना युद्धाच्या मार्गावर जाताना पाहू शकत नाही. या दोन्ही देशांचा इतिहास जुना असून तणाव वाढलेला आहे. मात्र, जगाला युद्ध नकोय शांतता पाहिजे, असं ट्रम्प म्हणाले. हे लवकर संपेल अशी आशा बाळगतोय, असं ट्रम्प म्हणाले. भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ते म्हणाले की आम्हाला याबाबत माहिती आहे. आम्ही सध्या अधिक भाष्य करणार नाही. सर्व घटनांवर नजर ठेवून आहोत. वॉशिंग्टनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाकडून जारी करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार भारतानं एअरस्ट्राईक केल्यानंतर अजित डोभाल यांनी अमेरिकेच्या एनएसए आणि विदेश मंत्री मार्को रुबियो यांना फोनवरुन माहिती दिली आहे.

पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांनी भारतानं मुजफ्फराबाद, कोटली, बहावलपूरमध्ये हल्ले केल्याच्या घटनेला पुष्टी दिली आङे. भारताचं कोणतही विमान किंवा जेट पाकिस्तानच्या एअरस्पेसमध्ये आलं नव्हतं, असं त्यांनी म्हटलं. पाकिस्तानमध्ये लाहोर आणि सियालकोट विमानतळं पुढील ४८ तासांसाठी बंद करण्यात आली आहेत. पाकिस्तानी माध्यम संस्थांच्या नुसार भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बहावलपूरमध्ये जामा मशीद सुभानअल्लाहवर देखील एअर स्ट्राइककेला आहे. ही मशीद जैश-ए- मोहम्मदची हेडक्वार्टर आहे. पाकिस्तानच्या कोटलीमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचं प्रशिक्षण केंद्र आहे. मुजफ्फराबादमध्ये लष्कर-ए- तोयबाचं ट्रेनिंग सेंटर आहे. तर, हिजबुल मुजाहिद्दीनचं हेडक्वार्टर आहे. ही ठिकाणं हाफिज सईद आणि मसूद अजहरचे अड्डे आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech