मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी १.६४९ किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त केले असून याची अंदाजे किंमत १६. ४९ कोटी रुपये आहे. २७ जानेवारी २०२५ च्या रात्री विशिष्ट माहिती आणि संशयाच्या आधारे अधिकाऱ्यांनी पॅरिसमार्गे साओ पावलो (ब्राझील) येथून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला अडवले. या प्रकरणी पाच दिवसांच्या कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी प्रवाशाकडून पांढऱ्या रंगाचा चूर्णयुक्त पदार्थ असलेल्या १७० कॅप्सूल जप्त केल्या. त्यात कोकेन असल्याचा संशय आहे. संशयित प्रवाशाला अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस) कायदा, १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली.