कानपूर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २६ हिंदूंचे टार्गेट किलिंग झाल्यानंतर आक्षेपार्ह विधान करणारे रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात कानपूरचे राम नारायण सिंह यांनी सीजेएम कोर्टात अर्ज दाखल केलाय. रॉबर्ट हे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका वाड्रांचे पती असून त्यांच्यावर समाजात द्वेष पसरवल्याचा आरोप आहे. तक्रारकर्ते राम नारायण सिंह यांचे वकील संजय मिश्रा म्हणाले की, न्यायालयाने पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. पोलिस अहवाल आल्यानंतर, एफआयआर नोंदवायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल.
गेल्या २२ एप्रिल रोजी हिंदू पर्यटकांच्या टार्गेट किलींगमध्ये कानपूरचे शुभम द्विवेदी यांनाही गोळ्या लागल्या होत्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी त्यांना आश्वासन दिले की ज्यांनी दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला आहे, त्यांना सोडले जाणार नाही आणि त्यांना शिक्षा केली जाईल. तर रॉबर्ट वाड्रांनी मात्री, या टार्गेट किलींगनंतर वादग्रस्त विधान केले होते. यासंदर्भात रॉबर्ट वाड्रा म्हणाले होते की, मला खूप वाईट वाटत आहे आणि या दहशतवादी कृत्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल माझी तीव्र संवेदना आहे. परंतु, आपल्या देशात, सरकार हिंदुत्वाबद्दल बोलत आहे आणि अल्पसंख्याकांना अस्वस्थ आणि त्रासदायक वाटते. सरकारकडून हिंदू-मुस्लीम भेदभावामुळेच दहशतवाद्यांनी हिंदूंचे टार्गेट किलींग केले असा आरोप वाड्रा यांनी केला होता.