तांत्रिक बिघाडानंतर दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे ड्रीमलाइनर हाँगकाँगला परतले

0

नवी दिल्ली : हाँगकाँगहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान एआय-३१५ माघारी परतले आहे. विमानाच्या वैमानिकाला उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आला. त्यामुळे बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर हाँगकाँगमध्ये सुरक्षितपणे परत उतरले. अधिकारी सध्या तांत्रिक समस्येचे नेमके कारण काय आहे याची तपासणी करत आहेत.

बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनरच्या या विमानाने हाँगकाँगहून नियोजित वेळेत उड्डाण केले होते. मात्र, उड्डाणानंतर वैमानानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय आला आणि त्याने हे विमान परत माघारी फिरवण्याचा निर्णय घेतला. विमान हाँगकाँगमध्ये सुरक्षितपणे उतरल्यानंतर तांत्रिक समस्येचे स्वरूप अद्याप कळू शकलेले नाही. एअर इंडियाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एआय-३१५ हे विमान “तांत्रिक समस्येमुळे” हाँगकाँगला परतले आहे. दरम्यान,एअर इंडियाच्या या विमानाने दुपारी १२ वाजून १६ मिनिटांनी हाँगकाँगहून उड्डाण केले आणि एका तासापेक्षा जास्त वेळानंतर ते खाली उतरले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech