ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह उभारणार- अजित पवार

0

बीड : धारूर शहराचा इतिहास मोठा आहे, अभिमानाचा आहे. सरसेनापती नेताजी पालकरांच्या शौर्याचा वारसा या भूमीला लाभला आहे. किल्ले धारूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार बालासाहेब रामदेव जाधव आणि सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना भावना व्यक्त केल्या. जाहीर सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, धारूरच्या पूर्व बाजूस असलेली गरम पाण्याची ‘सीतेची न्हाणी’ ही जगात मोजक्याच ठिकाणी आढळते. धारूर हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सोन्या-चांदीचं मोठं बाजारपेठ राहिलं आहे. असा इतिहास असलेल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे, असं स्पष्ट सूचित केलं.

धारूर शहरात विकासाची प्रचंड क्षमता आहे, खूप काही बदल घडवून आणता येऊ शकतो. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृहं उभारण्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत. आरोग्यसेवा सुधारण्यासाठी हॉस्पिटलच्या उभारणी व सुधारणा विषयक बैठका सुरू आहेत. विद्यार्थ्यांसाठी आधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला विमानतळ असावं, यासाठीही आम्ही नियोजन करत आहोत. CIIIT सारखा २०० कोटींचा मोठा प्रकल्प बीडमध्ये सुरू आहे. रोजगार, उद्योग, सेवा क्षेत्र असं सर्व क्षेत्रात संधी वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती सभेच्या निमित्तानं नागरिकांना दिली.

आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी पुढे जात आहोत. कुठल्याही समाज घटकाला आम्ही एकटं पडू देणार नाही. सर्वांना समान हक्क आणि समान संधी, हीच आमची भूमिका आहे. मतदार राजानं विश्वासानं घड्याळाच्या चिन्हावर मतदान करावं. बालासाहेब यांसह आमचे सगळे उमेदवार जनसेवेखातर कटिबद्ध असल्याची खात्री दिली. शहराचा विकास, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आदी प्रत्येक प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती पार पाडण्याचं वचन नागरिकांना दिलं.आज तुम्ही आम्हाला साथ द्या, उद्याच्या धारूरचा विकास हा पूर्ण ताकदीनं आम्ही करू, असा विश्वास दिला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech