नाशिक : राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिक मध्ये शिक्षकांच्या बैठकीत बोलताना कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली असून शिक्षकांनी आपल्या कामकाजाची पद्धत ही सुधारली पाहिजे विद्यार्थ्यांचा विकास विद्यार्थ्यांना अधिकाधिक दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी महत्त्वाची भूमिका निभवली पाहिजे असे सांगून शिक्षकांचे कान टोचले आहेत. महापालिकेच्या सभागृहामध्ये आयोजित शिक्षकांच्या बैठकीला शिक्षण मंत्री दादा भुसे हे मार्गदर्शन करत होते यावेळी ते म्हणाले की, सर्व सुविधा उपलब्ध असूनही महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यास पालक तयार होत नाहीत, यायाच विचार प्रशासनाने करणे गरजेचे आहे. काेट्यवधी रुपये खर्च करून स्मार्ट स्कूल तयार केल्या, शिक्षकांना वेळाेवेळी प्रशिक्षण दिले जाते. शासनाकडून सर्व सहकार्य मिळते तरीदेखील मनपाच्या शाळेतील पटसंख्येत झपाट्याने हाेत असलेली घट चिंताजनक आहे. प्रशासनाने याच्या कारणांचा शाेध घेऊन त्यावर काम करणे गरजेचे आहे. केवळ सूचना किंवा तक्रारी करून ही परिस्थिती सुधारणार नाही तर त्यासाठी तुम्हाला स्वत: शाळांमध्ये फिरून शिक्षकांच्या समस्या, पालकांच्या समस्या समजून घ्या, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रशासनाला दिले.
पटसंख्येच्या आकड्यांसाठी प्रशासनाधिकाऱ्यांची धावपळ बैठकीदरम्यान दादा भुसे यांनी गेल्या चार-पाच वर्षांचे पटसंख्येचे आकडे दाखवा, असे सांगितल्यानंतर प्रशासनािधकारी मीता चाैधरी यांनी हे आकडे उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आकडेवारी बघितल्यानंतर भुसे यांनी ही आकडेवारी आणि आकडेवारी या दाेघांचीही तपासणी करा, असे सांगत ही आकडेवारी चुकीची असल्याचे सुनावत, पुढच्यावेळी सुधारणा करण्याचे निर्देश दिले. मनपाच्या शाळांमध्ये काही सुिवधा करायच्या असतील तर त्याला शासन स्तरावरून सर्व सहकार्य करू, असेही ते यावेळी म्हणाले.
तुम्ही सुरूवात करा : दराडे सर्वसामान्य नागरिक आपल्या पाल्यांना महापािलकेच्या शाळेत प्रवेश घेत नाही, यावर काय उपाययाेजना करता येतील, असा प्रश्न नरेंद्र दराडे यांनी उपस्थित केला. यावर बाेलताना ते पुढे म्हणाले की, महापािलकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांना सक्तीने महापािलकेच्या शाळेत प्रवेश घेण्यास सांगता येईल का? याचा अभ्यास करा. सर्वप्रथम आपणच आपल्या पाल्यांना महापािलकेच्या शाळेत प्रवेश घ्या, म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा शाळेवर विश्वास बसेल, असे अधिकाऱ्यांना सुनावले.