महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून येणार आहेत. कारण, महायुतीची ही ताकद आहे जी एकदिलाने, एकजुटीने काम करीत आहे, रवी पाटील यांचा विश्वास
(धनश्री पाठारी)
कल्याण : राज्यात सध्या निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. नगरपंचायत, नगरपरिषद ते महानगरपालिका सगळीकडे निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेनेचे कल्याण येथील शहर प्रमुख रवी पाटील यांच्यावर संपूर्ण शहराची जबाबदारी असल्याने आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्षाप्रती असणारी कृतज्ञता आणि उमेदवाराबद्दल असणारी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना, त्यात प्रभाग क्र. ५ मधे मी राहतो त्यामुळे हा माझा प्रभाग आहे. हे माझे घर आहे त्यामुळे त्यावर माझ अधिक प्रेम आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे हे एक अस रसायन आहे, ते एक स्पिरिट आहे की ते एकदा कोणाला टच झाल की मातीच सोनं होत, अश्या पद्धतीच नेतृत्व आम्हाला मिळालेल आहे आणि ते देशाच भविष्य आहे. त्यामुळे अश्या लोकांच्या सानिध्यात राहून मी गेले कित्येक दिवस ४-५ तासच झोपतोय. गेले ३५ वर्षे मी निष्ठेने शिवसेनेचे काम करीत आहे. एकच नाव, एकच निशाणी, एकच क्षेत्र हे माझ कसब आहे आणि पक्ष वाढवण, पक्षासाठी काम करणे, हा माझा छंद आहे. कल्याण पश्चिम मधे २९ तिकीट शिवसेनेला देण्यात आली आहेत. आणि उरलेली ११ भाजपला देण्यात आली आहेत. त्यामुळे महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून येणार आहेत, असा मला विश्वास आहे. कारण, महायुतीची ही ताकद आहे जी एकदिलाने, एकजुटीने काम करीत आहे, असे रवी पाटील म्हणाले.