शत्रू भारताचे काही वाकडे करू शकणार नाही, भेंडवळीची भविष्यवाणी जाहीर

0

बुलढाणा : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळ घटमांडणीचे भाकीत आज, बुधवारी पहाटे सहा वाजता चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधार महाराज यांनी जाहीर केले.यावेळी शत्रू आपल्या देशाचे काही वाकडे करू शकणार नाही, अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे. भेंडवळ घटमांडणीत घटातील शत्रूचे प्रतीक असलेला मसूर हे धान्य थोड्या प्रमाणात दबलेले आढळले त्यामुळे शत्रूंच्या कारवाया सुरूच राहतील. परंतु करडी धान्य म्हणजे देशाची संरक्षण व्यवस्था..करडी हे धान्य साबूत असल्यामुळे संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. त्यामुळे शत्रू आपल्या देशाचे काही वाकडे करू शकणार नाही. परंतु देशावर संकट असल्याने राजाला प्रचंड ताण राहील देशाच्या तिजोरीत खळखळाट असेल अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय यावर्षी भरपूर पावसाळा असून जून सर्वसाधारण, जुलैमध्ये भरपूर पाऊस, ऑगस्टमध्ये साधारण पाऊस तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस बरसणार आहे.

याशिवाय, अवकाळी पावसाचे सुद्धा थैमान राहील त्याचबरोबर पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारण राहील. आणि करव्या वरील पुरी गायब असल्याने पृथ्वीवर प्रचंड संकट येतील त्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तींचा सहभाग असू शकतो. पिकांच्या उत्पन्नाची अनिश्चितता असून भावातही तेजी मंदिर राहील कुठे कमी तर कुठे जास्त पीक येईल. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी सुद्धा होईल आणि पिकांवर रोगराई पसरेल असाही अंदाज भेंडवळच्या घटमांडणीत वर्तवला आहे. दरम्यान, घटामध्ये मांडलेल्या १८ धान्यामध्ये अनेक ठिकाणी फेरबदल झालेले आढळून आले त्यावरून भविष्यवाणी जाहीर करण्यात आली. भेंडवळची भविष्यवाणी ऐकण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर विदर्भातील अनेक शेतकरी रात्रीपासूनच मुक्कामी होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech