नवी दिल्ली : देशातील कष्टाळू शेतकऱ्यांची सेवा करणे हे आपल्या सरकारसाठी विशेषाधिकारासारखे आहे. गेल्या ११ वर्षांच्या काळात सरकारने राबवलेल्या विविध उपक्रमांनी केवळ शेतकऱ्यांच्या समृद्धीला चालना दिली असे नव्हे तर त्यांनी कृषी क्षेत्रात समग्र परिवर्तन घडवून आणण्यात देखील योगदान दिले आहे. आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या सन्मान आणि समृद्धीसाठी काम केले आहे. येत्या काळात शेतकरी कल्याणासाठी आमचे प्रयत्न अधिक जोमाने सुरू राहतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले; “आपल्या शेतकरी बंधू-भगिनींना पूर्वी छोट्या गरजांसाठीही कर्ज घ्यावे लागत होते, परंतु गेल्या ११ वर्षात आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांचे जीवन खूप सुलभ झाले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी असो किंवा शेतकरी पीक विमा असो, आम्ही त्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. आता एमएसपीमध्ये सतत वाढ होत असल्याने, देशातील अन्न उत्पादकांना त्यांच्या पिकांना योग्य किंमत तर मिळत आहेच, शिवाय त्यांचे उत्पन्नही वाढत आहे.”
कृषी समुदायासाठी सन्मान तसेच समृद्धीचा महत्वाचा टप्पा गाठत गेल्या ११ वर्षांत सरकारने राबवलेल्या शेतकरी-हिताच्या उपक्रमांचा सर्वदूर परिणाम दिसून येत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी तसेच किसान पीक विमा यांसारख्या महत्त्वाच्या उपक्रमांवर भर देऊन शेतकरी कल्याणासाठी सरकारने अत्यंत महत्वाची पावले उचललेली आहेत. सरकारने मृदा आरोग्य आणि सिंचन यांसारख्या महत्त्वाच्या पैलूंकडे विशेष लक्ष दिले आणि ते मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरले यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला.