केडीएमसी निवडणूकीसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी यादी जाहीर न करता उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दिले एबी फॉर्म….. 

0

युतीत प्रवेश करणाऱ्यांना डावल्याने मनसे ,उबठाची धरली कास …. अजित दादाची राष्ट्रवादी ,आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या ए बी फार्म सह उमेदवारी अर्ज भरल्याने निवडणुकीत रंग…   

कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकच्च्या सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रस्थापित पक्षाच्या जागा वाटपाची गणिते त्याच पक्षातील बंडाळी पाहता महायुती च्या भाजपा व शिवसेना शिंदे पक्षाने सावध भूमिका घेत पक्षाची उमेदवारांची यादी घोषित न करता उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी पक्षाचा एबी फॉर्म दिल्याने उमेदवाराची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी चांगलीच दमछाक झाली . महायूती कडून शिवसेना शिंदे पक्ष ६६, भाजपा ५६ जागा वर लढणार, तर मनसे शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष एकत्रित मनसे ५४ तर शिवसेना उद्धव ठाकरे ६८ जागा वर उमेदवार उभे केलेत, युतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वबळावर लढणार असून ४० जागावर उमेदवार उभे केलेत.

काँगेस ५८ जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ३५ तर वंचित बहुजन आघाडी १५ जागा वर उमेदवार उभे केले आहेत असे एकूण पाच आठ पक्षा कडून ३९२ उमेदवार रिंगणात उभे केले आहेत.त्यामुळे पालिकेची निवडणुका काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक साठी ३१ पँनल मधील १२२ जागा साठी भाजपा , शिंदे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महा युती तील भाजपा शिवसेना शिंदे पक्षाची युतीची जागा वाटप झाले .या जगा वाटपात भाजपाला जागा ५६, तर शिवसेना शिंदे पक्षाला ६६ जागा मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेत ४२ जगावर आपले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना शिंदे गट व भाजपा युतीने आपल्या पक्षाची उमेदवार यादी जाहीर न करता काहीना सोमवारी रात्री उशिरा तर काहीना मंगळवारी सकाळी पक्षाचे एबी अर्ज चे वाटप केले .तर दुसरीकडे मनसे ,शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष व त्याचे मित्र पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाची जागा वाटपात बिघाड झाल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने वंचित बहुजन आघाडी बरोबर तिसरी आघाडी करून बाहेर पडले .मनसेने ५४ जागा तर शिवसेना उद्धव ठाकरे गट ६८ जागा वर दोन्ही पक्षांनी उमेदवार उभे करून त्यांना एबी फॉर्म दिले .कांग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व वंचित आघाडीने एकत्रित लढण्यासाठी काँग्रेसने ५८,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ३५ तर वंचित बहुजन आघाडी १५ अश्या १०८ जागावर उमेदवार उभे करून त्यांना आपआपल्या पक्षाचे एबी फॉर्म दिल्याने कल्याण डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गट,भाजपा,,मनसे,शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ,काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

काही दिवसापूर्वी शिवसेना ,भाजपा मध्ये प्रवेश करणार्यांना युतीने डावल्याने त्यांनी मनसे व शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कास धरीत आपला उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक रिगंणात आपले आव्हान कायम ठेवले, तर भाजपाच्या नाराज मंडळी ने पँनल तयार करीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरले, यामध्ये शिंदे च्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजपा नाराज यांनी बंडाचा झेंडा उभारत परिवर्तन पँनल माध्यमातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने प्रस्थापित पक्षातील बंडाळी पक्ष कसे रोखणार बंडोबाचा बंड कसे थंड करणार हे दोन दिवसात कळेल. या नाराजी नाट्याचा शिवसेना उबाठा ,मनसे क्राँग्रेस यांना फटाका बसला नसल्याचे त्यांच्या पक्षात ऐन वेळेस इनकमिंग झालेल्या उमेदवारामुळे दिसून येत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech