माजी खासदार इम्तियाज जलीलांच्या कारवर हल्ला, गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न

0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान एमआयएम पक्षातील नाराज गटाकडून माजी खासदार आणि पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. धावत्या कारच्या मागे पळून जलील यांना बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे एमआयएम पक्षातील नाराज गटाकडून ही मारहाण करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. त्या वाहनात इम्तियाज जलील पुढच्या सीटवर बसले होते. सुरुवातीला काळे झेंडे दाखवल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. इम्तियाज जलील यांच्या गाडीत मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या डोळ्याला दुखापत झाली आहे, अशी माहिती आहे. प्रचार रॅलीच्या दरम्यान बायजीपुरा जिन्सी भागात ही घटना घडली आहे. एमआयएमचा एक कार्यकर्ता जखमी आहे. इतर जे कार्यकर्ते आहेत, त्या संदर्भात चौकशी सुरु आहे.

कलीम कुरेशी नावाचे एक उमेदवार काँग्रेसकडून उभे आहेत, त्यांनी हा सगळा प्रकार केल्याचा आरोप इम्तियाज जलील यांच्याकडून करण्यात आला आहे. एमआयएमने संभाजीनगरमध्ये २२ नगरसेवकांची उमेदवारी कापून नव्यांना संधी दिली आहे. त्यावेळी, देखील असंतोष पसरला होता. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकांसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असून राजकीय वातावरण तापले आहे. यंदा मराठवाड्याची राजधानी संभाजीनगर महापालिकेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण, दोन शिवसेना, भाजप आणि एमआयएम पक्ष येथे ताकदीने निवडणूक लढवत आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादीही मैदानात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech