जळगाव : सोने चांदीच्या दरात कधी घसरण तर कधी मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. लग्नसराई सुरू असताना सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने सध्या ग्राहकांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने व चांदीच्या दराने उसळी घेतली आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात २ हजार २४० रुपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे जीएसटी सह सोन्याचे दर हे १ लाख ५९ हजार १३५ रुपये इतके झाले आहेत तर सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली असून एक किलो चांदीचे दर हे वाढले आहेत तर चांदी ही २ लाख ६७ हजार वर येऊन ठेपली आहे. सोन्या व चांदीच्या दरात झालेल्या या विक्रमी वाढ मुळे ग्राहकांमध्ये चिंतेच वातावरण आहे. आगामी काळात देखील सोने-चांदीचे दर हे कमी किंवा जास्त होतच राहणार असं मत सोने तज्ञांनी व्यक्त केला आहे.