गोमतीनगर ते डिब्रूगडदरम्यान धावणार अमृत भारत एक्सप्रेस

0

रविवारी ट्रेनचा ट्रायल रन करण्यात येणार

लखनऊ : आसाममधील शक्तीपीठ माता कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणारा प्रवास आता अधिक सुलभ होणार आहे. उत्तरप्रदेशच्या गोमतीनगर ते डिब्रूगडदरम्यान अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन लवकरच धावणार असून, या ट्रेनचा ट्रायल रन रविवारी १८ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे. या ट्रेनची वेळापत्रक व मार्गरेषा जाहीर करण्यात आली आहे. ईशान्य सीमांत रेल्वेकडून (नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे) या ट्रेनचे संचालन केले जाणार आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक १५९४९ दर शुक्रवारी रात्री ९ वाजता डिब्रूगडहून सुटून रविवारी सकाळी १०:०५ वाजता अयोध्या धाम येथे आणि दुपारी १:३० वाजता गोमतीनगर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक १५९५० दर रविवारी सायंकाळी ६:४० वाजता गोमतीनगरहून सुटून रात्री ९:५५ वाजता अयोध्या मार्गे मंगळवारी दुपारी १२:४० वाजता डिब्रूगड येथे पोहोचेल.ही ट्रेन दोन्ही दिशांनी मोरनहाट, सिमलगुडी, मरियानी, दीमापूर, डिफू, लुमडिंग, होजल, जगी रोड, गुवाहाटी, कामाख्या, रंगिया, नालबारी, बारपेटा, न्यू बोंगाईगाव, कोकराझार, न्यू अलीपूरद्वार, न्यू कूचबिहार, न्यू जलपाईगुडी, आलुआबारी रोड, किशनगंज, बरसोई, कटिहार, नौगछिया, खगडिया, बेगुसराय, बरौनी, हाजीपूर, सोनपूर, छपरा, सिवान, देवरिया, गोरखपूर, खलीलाबाद, बस्ती, मनकापूर, अयोध्या, अयोध्या कॅन्ट आणि बाराबंकी येथे थांबणार आहे.

दरम्यान, प्रवाशांच्या सुविधेसाठी हावडा ते दिल्लीदरम्यानही अमृत भारत एक्सप्रेस २२ जानेवारीपासून नियमितपणे धावणार आहे. या ट्रेनचाही ट्रायल रन १८ जानेवारी रोजी होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. जाहीर वेळापत्रकानुसार, गाडी क्रमांक १३०६५ दर गुरुवारी रात्री ११:१० वाजता हावडाहून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४:५० वाजता चारबाग (लखनऊ) मार्गे रात्री २:५० वाजता आनंद विहार येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक १३०६६ दर शनिवारी सकाळी ५:१५ वाजता आनंद विहारहून सुटून सायंकाळी ४:०५ वाजता लखनऊ मार्गे पुढील दिवशी सकाळी १०:५० वाजता हावडा येथे पोहोचेल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech