‘केएससीए’ला हायकोर्टातून तुर्तास दिलासा

0

एफआयआर रद्द करण्याची केली होती मागणी

बंगळुरू : चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेवर (केएससीए) देखील एफआयआर दाखल करण्यात आलाय. हा एफआयआर रद्द करण्यासाठी केएससीएने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी पुढील सुनावणी १६ जून रोजी होणार असून तोवर कुठलीही कारवाई होणर नसल्याचे हायकोर्टाने म्हंटले आहे. केएससीएच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने सांगितले की, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या व्यवस्थापनाने तपासात सहकार्य केल्यास पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

कर्नाटक उच्च न्यायालयाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) मार्केटिंग आणि महसूल प्रमुख निखिल सोसाळे यांच्या याचिकेवर सुनावणी केली, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या अटकेला आव्हान दिले आहे. अॅटर्नी जनरल म्हणाले की, आरोपी निखिलला आज सकाळी दुबईला जाताना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी सांगितले की तपास सुरू राहू द्या. गरज पडल्यासच अटक केली जाईल.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech