आयआयएफटीने पटकावला टाईम्स बी-स्कूल रँकिंग २०२६ मध्ये प्रथम क्रमांक

0

नवी दिल्‍ली  : आंतरराष्ट्रीय व्यापार आणि जागतिक व्यवसाय क्षेत्राशी संबंधित शिक्षण देणाऱ्या भारतीय परकीय व्यापार संस्थेने(आयआयएफटी) टाईम्स बी-स्कूल रँकिंग २०२६ मध्ये प्रथम स्थान पटकावले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील व्यवस्थापन शिक्षण देणारी एक प्रतिष्ठीत संस्था म्हणून पुन्हा एकदा तिचे स्थान अव्वल असल्याचे सिद्ध झाले आहे. आयआयएफटी ही भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत एक स्वायत्त संस्था असून दिल्ली, कोलकाता, काकिनाडा आणि गिफ्ट सिटी येथे तिची संकुले आहेत.

संस्थेने प्रथम स्थान मिळवल्याबद्दल अभिनंदन करताना, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य, दृष्टी आणि महत्त्वपूर्ण क्षमतांनी सक्षम करण्यासाठी आयआयएफटी ने केलेल्या निरंतर प्रयत्नांचा हा दाखला आहे, अशा शब्दात या कामगिरीचे वर्णन केले. ते म्हणाले की, ही संस्था भविष्यातील नेते घडवण्यात आणि जागतिक व्यापार क्षेत्रात भारताचे अस्तित्व अधिक मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

वाणिज्य सचिव आणि आयआयएफटी चे कुलपती राजेश अग्रवाल यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेची प्रगती तिची मजबूत शैक्षणिक पायाभरणी, विस्तारत चाललेला जागतिक दृष्टिकोन आणि उत्कृष्टतेप्रति असलेली वचनबद्धता प्रतिबिंबित करते, असे त्यांनी नमूद केले आयआयएफटी भारताला आंतरराष्ट्रीय व्यापारात जागतिक महासत्ता म्हणून उदयास येण्याच्या आकांक्षेला पाठबळ देते आणि राष्ट्रीय व्यापार, आर्थिक आणि धोरणात्मक प्राधान्यक्रमांशी सुसंगत असलेल्या जागतिक स्तरावर सक्षम व्यवस्थापन व्यावसायिकांना घडवून ‘विकसित भारत’च्या संकल्पनेत योगदान देते, असे त्यांनी सांगितले.

आयआयएफटी चे कुलगुरू प्रा. राकेश मोहन जोशी यांनी पीयूष गोयल आणि राजेश अग्रवाल यांचे त्यांची दूरदृष्टी आणि अविचल पाठबळाबद्दल आभार मानले आणि आंतरराष्ट्रीय व्यवसायातील व्यवस्थापन शिक्षणात शैक्षणिक कठोरता, धोरणात्मक सुसंगतता, उद्योग क्षेत्रातील सहभाग आणि आंतरराष्ट्रीय पोहोच वाढवून उत्कृष्टता प्राप्त करण्याची आपली वचनबद्धता व्यक्त केली; तसेच अध्यापन, संशोधन आणि कामकाजात वर्तमानातील समकालीन वास्तव एकात्मिक करून या संस्थेला जागतिक दर्जाची संस्था बनवण्याचा संकल्प केला.

१९६३ मध्ये स्थापन झालेली, भारतीय परकीय व्यापार संस्था हे भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयांतर्गत असलेले एक मान्यताप्राप्त विद्यापीठ आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवसायातील एक प्रमुख संस्था म्हणून, आयआयएफटी आघाडीचे एमबीए प्रोग्राम, कार्यकारी शिक्षण आणि डॉक्टरेट संशोधन उपलब्ध करून देते, ज्यामुळे भारताच्या जागतिक वाणिज्य आणि व्यापार धोरणातील वाढीस मदत होते. या संस्थेची दिल्ली, कोलकाता, काकिनाडा आणि गिफ्ट सिटी येथे संकुले आहेत आणि दुबईमध्ये पहिले परदेशी संकुल सुरू करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech