कोपरीतील चैत्र नवरात्रौत्सवाच्या देवीचा विसर्जन सोहळा उत्साहात

0

श्री देवी अंबे मातेचा रथ ओढुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिरवणुकीत सहभागी

ठाणे : गुढी पाडव्यापासून सुरु झालेल्या धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर शुक्रवारी देवीचे उत्साहात भव्य मिरवणुक काढून भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले. सायंकाळी अंबे मातेच्या जयघोषात उत्तरपुजेची महाआरती पार पडली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वडील संभाजी शिंदे,सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पत्नी सौ. लता एकनाथ शिंदे, सून सौ. वृषाली श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ठाणे पुर्व, कोपरी, येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजीत धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या श्री अंबे मॉ चैत्र नवरात्रौत्सवात गेले नऊ दिवस सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ करण्यात आला. रामनवमी दिनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी देवी मातेचे दर्शन घेतले तर, पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सपत्नीक अंबे मातेची आरती केली. त्यानंतर सौ. लता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हजारो भाविकांना देवीचा महाप्रसाद अन्नदान करण्यात आले. तर, रात्रौ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीच्या दरबारात बलिदान आणि पुर्णाहुती अधिष्ठान करून १०८ परिक्रमा पुर्ण केल्या.

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी महाआरतीनंतर सजवलेल्या रथातुन देवीच्या विसर्जन सोहळ्यास प्रारंभ झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः देवीचा रथ ओढला. या विसर्जन सोहळ्याला खा.डॉ. श्रीकांत शिंदे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, प्रकाश कोटवानी, राहुल लोंढे, पांडुरंग पाटील, प्रमोद बनसोडे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे आदीसह हजारोंच्या संख्येने भाविक व शिवसैनिक उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात, विविध कलाकृती साकारलेल्या पथकांसमवेत श्री अंबे मातेचा गजर करीत निघालेली मिरवणुक कोपरीतील भाजी मार्केट, बारा बंगला, नौपाडा, राममारूती रोड मार्गे मासुंदा तलाव येथील विसर्जन घाटाकडे मार्गस्थ झाली. रात्रौ देवीची विधीवत आरती करून तलावात तीन प्रदक्षिणा घालुन विसर्जन सोहळा पार पडला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech