नवनिर्वाचित बेपत्ता नगरसेवक प्रकरणी पदाधिकारीनी राबवली पोस्टर बाजी…

0

कल्याण : कल्याण डोंबिवली २०२६सार्वत्रिक निवडणूकीत उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या मशाल चिन्हावर तब्बल ११उमेदवार निवडून आले. यात आता पर्यंत चार नगरसेवक १६ तारखेपासून नॉट-रिचेबल आहे मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नील केणे अशी बेपत्ता नगरसेवकांची नावे असून राजकीय घाडामोडी पार्श्वभूमीवर भाजपा ५०, शिवसेना शिंदेगट ५३, काँग्रेस २, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट १, मनसे ५ आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष ११ असे पक्षीय बळाबळ असून सत्तासुदंरीच्या खुर्ची साठी राजकीय गणिते, राजकीय समीकरण, राजकीय घाडामोडी नाट्य पाहता या नाँट रिचेबल नगरसेवकांची भुमिका काय ? हे ते समोर आल्यानंतर नेमके कळेल पंरतु या बेपत्ता नगरसेवक प्रकरणी उबाठा गटाने नगरसेवकांचा शोध घ्यावा यासाठी पदाधिकाऱ्यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पोस्टर लावून नगरसेवकांचा शोध घेण्याचा आदेश दिल्याने कल्याण पूर्वेतील उबाठा पक्षाच्या पदाधिकारी ,आणि शिवसैनिक यांनी सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर पोस्टर चिटकवून बेपत्ता नगरसेवक आढळल्यास बाबत माहिती कोळसे वाडी शिवसेना शाखेत घ्यावी अशी मागणी पोस्टर बाजी करीत केल्याने राजकीय घाडामोडीत चांगलीच रगंत आली असल्याचे चित्र दिसत आहे.

“उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे युवासेना पदाधिकारी नीरज दुबे यांनी प्रसिध्दी माध्यामां समोरे सांगितले की, उबाठाचे मधुर म्हात्रे, किर्ती ढोणे यांच्या बेपत्ता प्रकरणी पोस्टर लावून शोध घेत आहोत, हे दोन्ही जण कल्याण पूर्वेतील असल्याने आम्ही आमच्या वतीने शोध घेत असून कल्याण पश्चिमेतील उबाठाचे दोन नवनर्वचित नगरसेवक बेपत्ता प्रकरणात कल्याण पश्चिमेतील पदाधिकारी त्यांच्या पध्दतीने शोध घेत आहेत. उद्या उबाठा गटाची बैठक असून या बैठकीला या चारही नवनर्वचित बेपत्ता उबाठा पक्षाच्या उमेदवारांना हजर राहण्यासाठी मेल ,व्हाँटस् अँप् द्वारे मँसेज पाठवला आहे. गटनेता उमेश बोरगावकर यांच्या व्हीपच्या अनुषंगाने त्यांना हजर राहणे बंधनकारक असून, गैहजर राहल्यास कायदेशीर निलंबन कारवाईचा बडगा अटळ आहे.

तसेच प्रसिध्दी माध्यामांना सामोरे जाता, उबाठा नेते वरूण सरदेसाई यांनी सांगितले असल्याचे समजते की, आम्ही विरोधी पक्षात बसू तसेच कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चार नगरसेवकांनी अद्याप कोकण आयुक्तांकडे नोंदणी केलेली नाही. त्यामुळे आम्ही येत्या दोन-चार दिवसांत ‘व्हीप’ बजावणार आहोत. या काळात जर हे नगरसेवक गैरहजर राहिले, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल. आता या चारही नगरसेवकांनी हे ठरवायचे आहे की, त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत, निकालानंतर जर त्यांनी पक्ष आणि आपली भूमिका बदलली, तर पुढील पाच वर्षे ते मतदारांना कशा प्रकारे सामोरे जाणार?” ​या नाट्यमय राजकीय घडामोडी पाहता केडीएमसी मधील राजकीय नाट्य चांगलेच तापले असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech