केडीएमसीच्या निवडणुकीत नातेगोत्यांची भाऊ बंदकी नातेवाईकांना उमेदवारी….

0

कल्याण : केडीएमसी निवडणूकीच्या रिंगणात सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना तर काही माजी नगरसेवकांच्या पत्नी पत्नी, मुलगी, मुलगा, भाऊ ,बहीण आदी घरगुती भाऊबंदकीची नाती गोती जपत उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले पक्षातील सच्चे कार्यकर्ते आणि पदाधिकार्यानी उमेदवारी मिळण्यापासून डावलल्याची खंत सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गट, मनसे, भाजपा पक्षातून नाते गोते तसेच घरातील नातेवाईक असलेल्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या मध्ये डोंबिवलीतील पॅनल क्रमांक २३ मधून भाजपतर्फे दीपेश म्हात्रे आणि त्यांचे बंंधू जयेश म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. दोघेही भाऊ शिंदे सेनेत होते. त्यानंतर उद्धव सेनेत गेले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दोघांनाही भाजपने उमेदवारी दिल्याने दोघेही भाऊ निवडणूकीच्या रिंगणात आहेत. पॅनल क्रमांक ६ मधून शिंदे सेनेतर्फे संजय पाटील आणि त्यांची पत्नी निलीमा पाटील हे दोघाना उमेदवारी मिळाली आहे. पॅनल क्रमांक २२ मधून शिंदे सेनेतर्फे विकास म्हात्रे आणि पत्नी कविता म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाकळ केला आहे. हे दोघेही पती पत्नी भाजपमध्ये होते. त्यांनी नुकताच शिंदे सेनेत प्रवेश केला. त्या दोघांना शिंदे सेनेने उमेदवारी दिली आहे.भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि त्यांची पत्नी माजी नगरसेविका मनिषा धात्रक यांना भाजपने उमेदवारी दिली गेली नस्लयाने त्यांनी पॅनल क्रमांक २५ मधून शैलेश धात्रक, त्यांची पत्नी मनिषा धात्रक आणि त्यांची मुलगी पूजा धात्रक यांनी मनसेकडून उमेदवारी दाखल केली आहे. धात्रक कुटुंबच निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे.

शिवसेना भाजप युतीच्या पॅनल २२ मधील दोन जागा भाजपाला तर दोन जागा शिवसेना शिंदे पक्षाला सोडण्यात आल्याने भाजपाच्या दोन जागा पैकी एका जागेवर भाजपचे प्रकाश भोईर व अनमोल म्हात्रे यांना उमेदवारी दिली गेली आहे. त्यामुळे शिंदे सेनेचे संदेश पाटील आणि त्यांच्या पत्नी रसिका पाटील यांनी मनसेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आधी भाजप असलेले नंतर शिंदे सेनेत गेलेले आणि पुन्हा भाजपमध्ये जाणारे महेश पाटील व त्यांची बहिण सुनिता पाटील या दोघाना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर मनसेतून शिंदे सेनेत गेलेल्या ज्योती मराठे आणि त्यांचा मुलगा सूरज मराठे यांना उमेदवारी दिली आहे.मनसेतून डोंबिवली पश्चिमेतील पॅनल क्र.२१ मधून मनसेचे प्रल्हाद म्हात्रे वडील व त्याची मुलगी वेदांगी म्हात्रे या दोघा पिता पुत्री ना मनसे कडून उमेदवारी दिली आहे.

कल्याण पूर्वेतील भाजपच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या जाऊ मनिषा अभिमन्यू गायकवाड यांना पॅनल क्रमांक ११ मधून उमेदवारी दिली गेली आहे. तर कल्याण ग्रामीणचे शिंदे सेनेचे आमदार राजेश माेरे यांचे सूपूत्र हर्षल मोरे यांना प्रभाग क्रमां २६ मधून उमेवादी दिली गेली आहे. तर शिंदे सेनेचे कल्याण पश्चिमेचे शहर प्रमुख रवी पाटील यांची बहिण प्रमिला पाटील यांना पॅनल क्रमांक ५ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचा मुलगा विक्रांत शिंदे यांना पॅनल क्रमांक १२ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पत्नी हेमा पवार यांना पॅनल क्रमांक ७ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या पत्नी अस्मिता मोरे यांना पॅनल क्रमांक ९ मधून उमेदवारी देण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech