भारत-फ्रान्स संरक्षण, अवकाश आणि अणु सहकार्य वाढविण्यास सहमत

0

पॅरिस : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि त्यांचे फ्रान्सचे समकक्ष जीन-नोएल बॅरोट यांनी संरक्षण, सुरक्षा, अंतराळ आणि नागरी-अणु क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर सहमती दर्शविली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा फ्रान्सने निषेध केल्याबद्दल आणि दहशतवादाविरुद्ध भारताच्या बचावाच्या अधिकाराला पाठिंबा दिल्याबद्दल जयशंकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी फ्रान्सचे जीन-नोएल बॅरोट यांच्याशी विविध मुद्द्यांवर विस्तृत चर्चा केली. या चर्चेमध्ये दोन्ही बाजूंनी संरक्षण, सुरक्षा, अवकाश आणि नागरी-अणु सहकार्य यासारख्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावर सहमती दर्शविली.

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या सीमापार दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्याबद्दल जयशंकर यांनी फ्रान्सचे आभार मानले आहेत. आणि “दहशतवादाविरुद्ध भारताच्या स्वतःचे रक्षण करण्याच्या अधिकाराला दृढ पाठिंबा दिल्याबद्दल” कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांमध्ये भारतीय उपखंडातील परिस्थिती, युक्रेन संघर्ष, मध्य पूर्व आणि इंडो-पॅसिफिक यासारख्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech