ग्लोबल फायरपावर रँकिंगमध्ये भारत चौथ्या स्थानावर, पाकिस्तान टॉप १० मधून बाहेर

0

नवी दिल्ली : जगभरात वाढत असलेल्या भूराजकीय अनिश्चितता आणि संघर्षांच्या पार्श्वभूमीवर ग्लोबल फायरपावर (जिएफपी) ने २०२६ साठी लष्करी सामर्थ्याची क्रमवारी जाहीर केली असून, यामध्ये भारत चौथ्या स्थानावर कायम आहे तर पाकिस्तानला या रँकिंगमध्ये मोठा फटका बसला आहे. पाकिस्तान गेल्या वर्षी १२ व्या स्थानावर होता, मात्र २०२६ मध्ये तो १४ व्या स्थानावर घसरला आहे.या रँकिंगमध्ये जगातील १४५ देशांच्या सैन्य क्षमतेचे मूल्यमापन करण्यात आले आहे.ही क्रमवारी सैनिकांची संख्या, लढाऊ विमाने, शस्त्रसाठा, रणगाडे, संरक्षण बजेट, भौगोलिक स्थिती आणि लॉजिस्टिक्ससह ६० हून अधिक निकषांवर आधारित आहे. या सर्व घटकांच्या आधारे प्रत्येक देशाचा पॉवर इंडेक्स स्कोअर ठरवला जातो.

या रँकिंगमध्ये भारत चौथ्या स्थानावर कायम आहे. भारताकडे मोठे सशस्त्र दल, प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली, S-400 एअर डिफेन्स सिस्टम आणि राफेलसारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने आहेत, ज्यामुळे भारताची लष्करी ताकद अधिक बळकट झाली आहे. तर ऑपरेशन ‘सिंदूर’दरम्यान भारतासमोर झुकलेल्या पाकिस्तानला या रँकिंगमध्ये मोठा फटका बसला आहे. पाकिस्तान गेल्या वर्षी १२ व्या स्थानावर होता, मात्र २०२६ मध्ये तो १४ व्या स्थानावर घसरला आहे. पाकिस्तानच्या रँकिंगमध्ये सातत्याने घसरण होत आहे. पाकिस्तानने २०२४ मध्ये: ९ वा क्रमांक, २०२५ मध्ये: १२वा क्रमांक, २०२६ मध्ये: ०.२६२६ PwrIndx स्कोअरसह १४ वा क्रमांक मिळवला आहे.

या लष्करी सामर्थ्याच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर अमेरिका – ०.०७४१ आहे. अमेरिकेकडे जगातील सर्वात शक्तिशाली लष्कर, हवाई दल आणि नौदल आहे. रशिया दुसऱ्या क्रमांकावर (PwrIndx: ०.०७९१) चीन तिसऱ्या क्रमांकावर (PwrIndx: ०.०९१९) आहे. चौथ्या स्थानावर भारत – ०.१३४६, पाचव्या स्थानावर दक्षिण कोरिया – ०.१६४२, फ्रान्स यंदा सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. जपानने एक स्थानाची झेप घेत सातवा क्रमांक मिळवला आहे. युनायटेड किंगडम मागील दोन वर्षांत सहाव्या स्थानावरून आठव्या स्थानावर ०.१८८१ घसरला आहे. नव्या स्थानावर तुर्की – ०.१९७५ आणि दहाव्या स्थानावर इटली – ०.२२११ देशाचा समावेश आहे. जर्मनीने सर्वाधिक प्रगती करत २०२४ मधील १९व्या स्थानावरून २०२६ मध्ये १२ व्या स्थानावर झेप घेतली आहे.

ग्लोबल फायरपावरनुसार, “परिपूर्ण PwrIndx स्कोअर ०.०००० असतो, मात्र सध्याच्या जीएफपी सूत्रांनुसार तो मिळवता येत नाही. त्यामुळे PwrIndx मूल्य जितके कमी, तितकी त्या देशाची पारंपरिक युद्ध क्षमता अधिक शक्तिशाली मानली जाते.” या रँकिंगवरून स्पष्ट होते की जगभरात वाढत्या भू-राजकीय अनिश्चितते आणि संघर्षांच्या पार्श्वभूमीवर देश आपापल्या संरक्षण रणनीती अधिक मजबूत करत आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech