इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग,  विमानाला पक्षी धडकल्यामुळे घडली घटना

0

रांची : झारखंडची राजधानी रांची येथील विमानतळावर आज, सोमवारी इंडिगोच्या विमानाला मोठा अपघात होता होता टळला. बिहारच्या पाटण्याहून येणारे विमान लँडिंगपूर्वी एका पक्षाला धडकले. यानंतर, विमान ४० मिनिटे हवेतच ठेवण्यात आले. यानंतर, पायलटने सुरक्षितपणे इमर्जन्सी लँडिंग केले. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावर १७५ प्रवाशांना घेऊन येणाऱ्या इंडिगो विमानाचे इमरजन्सी लँडिंग करण्यात आले. सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित असून केवळ विमानाचेच (एयरबस ३२०) नुकसान झाले आहे. विमानतळ संचालक आरआर मौर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रांचीजवळ इंडिगोच्या विमानाची एका पक्ष्याला धडक बसली. घटनेच्यावेळी, विमान १०-१२ नॉटिकल मैल अंतरावर अर्थात ३ ते ४ हजार फूट उंचीवर होते. यावेळी एक गिधाड विमानाला धडकले. यानंतर विमानाचे इमरजन्सी लँडिंग करण्यात आले. आणखी एका सूत्राने म्हटले आहे की, पक्षाच्या धडकेदरम्यान पायलटने समयसूचकता दाखवत विमान ४० मिनिटांपर्यंत सुरक्षितपणे हवेत ठेवले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech