ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनातून नवतंत्रज्ञानाची माहिती – गोयल

0

प्रदर्शनात मोफत पाणी तपासणी; सोमवारी समारोप

शहादा : देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे सुरू असलेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती घडवून आणू शकतात,” असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी केले. ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा सोमवारी (5 जानेवारी) समारोप असून शेतकऱ्यांसाठी प्रवेश मोफत आहे.

शहादा येथील नवीन बस स्टॅन्ड जवळील लोणखेडा रस्त्यावर सुरू असलेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात शनिवारी (दि. 3) प्रयोगशील शेतकरी, फार्मर प्रोड्युसर कंपनी तसेच आदर्श ग्रामपंचायती यांचा श्री. गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. निर्मल सीडसचे संचालक डॉ. सुरेश पाटील, मेट्रोजन बायोटेकचे प्रियंक शहा व रुची शहा, नमो बायो प्लांटचे स्वराज पारख, ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी, एअरटेल बायोप्लांटचे पद्मसिंह निंबाळकर, कृषीदूत बायो हर्बलचे रामनाथ जगताप, आनंद ॲग्रो केअरचे घनश्याम हेमाडे व शोभा हेमाडे, ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रदर्शनात 150 हून अधिक स्टॉल्स असून अद्यावत यंत्र व तंत्रज्ञान यावर भर देण्यात आला आहे.

प्रक्रिया उद्योग, निर्यातीबाबत ॲग्रोवर्ल्डकडून अपेक्षा

जैवविविधतेने संपन्न असलेल्या या जिल्ह्यात मिलेट्स, एकात्मिक शेती, कुक्कुटपालन, मधमाशीपालन, केळीबरोबरच कलिंगड, पपई, मिरची व भाजीपाल्यातही हा जिल्हा अव्वल आहे. कृषी उत्पादनाला आता प्रक्रियेची जोड दिल्यास शेतकऱ्यांना त्याचा अधिक लाभ होईल. ॲग्रोवर्ल्डने पुढच्या वर्षी ही बाब लक्षात घेऊन कृषी निर्यात आणि प्रक्रिया उद्योगाशी निगडित स्टॉल्स व चर्चासत्र आयोजित करावे, अशी अपेक्षा देखील श्री. गोयल यांनी यावेळी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी शेतीत सोलर वीज पंपाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. ॲग्रोवर्ल्डच्या प्रकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

मोफत पाणी परीक्षण, रोज 100 लकी ड्रॉ

नाशिक येथील आनंद ॲग्रो केअरतर्फे शेतकऱ्यांना प्रदर्शनात मोफत पाणी परीक्षण तसेच तत्काळ रिपोर्टची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी प्रदर्शनास येताना पाणी नमुना आणण्याचे घनश्याम व शोभा हेमाडे यांनी केले आहे. पदमावती सीड्सतर्फे लकी ड्रॉद्वारे रोज 100 जणांना ग्रो बँग गिफ्ट देण्यात येत आहे.

भर पावसातही मशागत करणाऱ्या हाय व्हील्ससह फवारणीसाठीचे ड्रोन प्रात्यक्षिक, सोलर फार्मिंग, झटका मशीन, सोलरवरील वॉटर पंपाचेही स्टॉल्स आहेत. शेत मजुरीला पर्याय ठरतील, अशा पिकांच्या लागवडीपासून ते पिकांच्या काढणी, मळणीपर्यंतच्या अवस्थेतील विविध प्रकारचे लहान मोठे अत्याधुनिक 25 हून अधिक कृषी यंत्र व औजारांचे स्वतंत्र दालन आहे. या प्रदर्शनात 150 हून अधिक स्टॉल्स असून प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मोफत असून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी केले.

पुरस्कार प्राप्त शेतकरी, गट व ग्रामपंचायत

*ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी* – श्री. धर्मेंद्र पाटील (बोराळे, पोस्ट – कुकावल, ता. शहादा.), श्री. मनोहर पाटील (रा. खलाणे, ता. शिंदखेडा), श्री. भरत पाटील (मु. पो. तिखोरे, ता. शहादा), श्री. नरेंद्र गिरासे (जावरा तर्फे बोरद, ता. शहादा), श्री. पुरुषोत्तम पाटील (मामाचे मोहिदे, ता. शहादा), श्री. सेगा राज्या पटले (कुंभरी, ता. धडगाव), श्री. योहान गावित (भवरे, ता. नवापूर), श्री. माधव माळी (दुधाळे, ता. जि. नंदुरबार.), श्री. राजाराम पाटील (कोळदा, ता. जि. नंदुरबार.), श्री. विश्वनाथ पाटील (कुडवाड, ता. शहादा). *ॲग्रोवर्ल्ड आदर्श कृषी उद्योजक* – श्री. मधुकर तुकाराम पाटील (ता. शहादा), श्री. जितेंद्र पाटील (शहादा). ॲग्रोवर्ल्ड आदर्श शेतकरी गट – बलराम शेतकरी गट (तळोदा), महात्मा फुले शेतकरी गट (वडफळी). *ॲग्रोवर्ल्ड आदर्श फार्मर प्रोड्युसर कंपनी* – पातोंडा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड (नंदुरबार), सरल कृष्ण शेतकरी उत्पादक कंपनी (वावद). *ॲग्रोवर्ल्ड आदर्श वन व वन्य प्राणी संरक्षक* – सागर निकुंभे शहादा. *ॲग्रोवर्ल्ड आदर्श वृक्ष संवर्धन* – सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती, पिपळखुटा. *ॲग्रोवर्ल्ड आदर्श ग्रामपंचायत* – तळवे ता. तळोदा, मोरखी ता. अक्कलकुवा, कात्री ता. धडगाव, भुजगाव ता. धडगाव, बामखेडा ता. शहादा. *ॲग्रोवर्ल्ड आदर्श कृषी विस्तारक* – श्री. जितेंद्र सोनवणे (ता. जि. नंदुरबार), श्री. संदीप कुंवर

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech