इराणने इस्रायलवर १०० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली, आयडीएफनेही जोरदार प्रत्युत्तर

0

तेहरान : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाला आहे. ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत इस्रायलने इराणवर हल्ला चढवला आहे. आतापर्यंत या हल्ल्यांमध्ये ७८ लोक मारले गेले आहेत आणि ३५० हून अधिक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या मुख्य अणुऊर्जा प्रकल्पाचा वरचा भाग उद्ध्वस्त केला आहे. इस्रायलची सुरक्षा सुनिश्चित होईपर्यंत हे ऑपरेशन सुरूच राहणारअसल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले आहे. इराणने या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आणि या कारवाईला ‘ट्रू प्रॉमिस थ्री’ असे नाव दिले. इराणने दावा केला आहे की त्यांनी इस्रायलवर १०० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech