अणुकेंद्रावरील हल्ल्यानंतर इराणचा अमेरिकेला थेट इशारा

0

तेहरान : इस्राइल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेने थेट एंट्री करत इराणमधील तीन प्रमुख अणुकेंद्रावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर आता इराणकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तसेच आता या भागात असलेला प्रत्येक अमेरिकन नागरिक आणि अमेरिकन सैनिक आमच्या निशाण्यावर आहे, असा इशारा इराणने दिला आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून हा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून इराणकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली आहे. अमेरिकेने इराणच्‍या हवाई हद्दीचे उल्लंघन करत इराणविरुद्ध गुन्हा केला आहे.  आता यापुढे पश्चिम आशियाई प्रदेशात त्याचे कोणतेही स्थान नाही. अमेरिकेचे अध्‍यक्ष, तुम्ही ते सुरू केले पण याचा शेवट आम्‍हीच करु ” असे इराणमधील सरकारी टीव्‍ही चॅनेनलेन अमेरिकेच्या तळांचे ग्राफिक प्रदर्शित करताना म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यानंतर आता मध्य पूर्वेमधील तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्याच्या काही तास आधी, इराणचे संरक्षण मंत्री अझीझ नासिरजादेह यांनी अमेरिकेला हल्ला केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती. इराणचे संरक्षण मंत्री म्हणाले, ‘सर्व अमेरिकन तळ आमच्या आवाक्यात आहेत आणि जर अमेरिका हल्ला करेल तर आम्ही त्यांना सडेतोड प्रत्‍युत्तर देवू. दरम्यान, अमेरिकन सैन्यदलांकडून इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याची माहिती दिली. इराणमधील अणुकेंद्रांना लक्ष्य करण्यासाठी अमेरिकेने अत्याधुनिक बी२ बॉम्बर्स विमानांकडून हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच या हल्ल्यांसाठी शक्तिशाली बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे

अमेरिकेने इराणच्या फोर्डो, नतांज आणि इस्फहान या तीन ठिकाणच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले केले आहेत. हवाई दलाने इराणमधील अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बेचा वर्षाव केला, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते. सध्या, मध्य पूर्वेतील अमेरिकन तळांवर सुमारे ४०,००० अमेरिकन सैनिक काम करत आहेत. याची संख्‍या नेहमीपेक्षा दहा हजारांनी जास्‍त आहे. हे तळ इराणच्या क्षेपणास्त्रांच्या थेट रेंजमध्ये आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech