कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन वास्तूचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

0

ठाणे : कल्याण शहरातील नविनतम आणि अद्ययावत सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन इमारतीचा भव्य उद्घाटन समारंभ रविवार, दि.१८ मे २०२५ रोजी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यांच्या हस्ते फीत कापून व कोनशिला अनावरण करून या कार्यालयाचे लोकार्पण केले जाईल.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असतील. तर वनमंत्री गणेश नाईक, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, सुरेश म्हात्रे हे प्रमुख अतिथी असून आमदार रवींद्र चव्हाण, किसन कथोरे, सुलभा गायकवाड, विश्वनाथ भोईर, निरंजन डावखरे, कुमार आयलानी, राजेश भोईर, ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हे नूतन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय कल्याणमधील चक्की नाका, सेंट लॉरेन्स स्कूलजवळ, उंबर्डे येथे असून या कार्यालयामुळे कल्याण आणि परिसरातील नागरिकांची परिवहन संबंधी कामे अधिक सोयीस्करपणे होणार आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech