देसाई यांच्या फोनकॉलची व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
कल्याण : निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाला प्रथम प्राधान्य देत शिवसेना पक्षासाठी मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या कौस्तुभ देसाई यांनी आपल्या ठाकरे गटात असलेले बंधू कल्पेश देसाई यांच्या पत्नीविरोधात प्रचार केल्याचा व्हिडीओ सद्ध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ अनुषंगाने राजकीय पक्षासह, अपक्ष उमेदवार प्रचारात रंगत आली असून पँनल पध्दतीने निवडणूकीला समारे जाताना उमेदवारांची दमछाक होत असताना आपल्या पँनलला विजय करण्यासाठी रणधुमाळी करीत प्रचाराचे नवीन फंडे उमेदवार वापरत आहेत. असाच एक प्रकाराचा फंडा वापरत भम्र्हणध्वनी मार्फत शिवसेना भाजपा युतीच्या उमेदवारांना मते द्या असा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या व्हायरल व्हिडीओ ने सोशल मिडिया वर धुमाकूळ घातला आहे.
पँनल क्रं ५ मध्ये महायुती समोर ठाकरे बंधूंचे पँनल उभे असून महायुती आणि ठाकरे बंधू यांच्यात सामना रंगणार आहे. पँनल क्रमांक ५ मध्ये शिवसेना शहर प्रमुख रवि पाटील यांच्या बहिण प्रमिला पाटील यांच्या विरोधात उबाठा शिवसेनेच्या कावेरी देसाई यांच्यात लढत आहे. नुकताच माजी नगरसेविका कस्तुरी देसाई आणि माजी मनसे शहर अध्यक्ष कस्तुभ देसाई यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. तर महिनाभर आधी कल्पेश देसाई यांनी शिवसेणा ठाकरे गटात प्रवेश केला होता.
निवडणूक जाहीर होताच पँनल ५ मध्ये ठाकरे गटातून कल्पेश देसाई यांच्या पत्नी कावेरी देसाई यांना उमेदवारी मिळाली तर प्रभाग क्र. ६ मध्ये कौस्तुभ देसाई यांच्या पत्नी माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांना शिवसेनेतर्फे उमेदवार देण्यात आली. दरम्यान प्रभाग क्र. ५ मध्ये महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा असे आवाहन करणाऱ्या कौस्तुभ देसाई यांच्या फोनकॉलची व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाल्याने वहिनी विरोधात प्रचार करण्याचा प्रसंग महायुतीत आल्याने दीर विरुद्ध भावजय असा प्रचार सुरु असल्याची चर्चा रंगली असल्याचे दिसत आहे.