लातूर : कर्जमाफी ही मध्यमवर्गीय व गरजू शेतकऱ्यांसाठीच असल्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लामजना येथे झालेल्या प्रचार सभेत केले. कर्जमाफीबाबत पसरवले जात असलेले गैरसमज दूर करत त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मंत्री बावनकुळे म्हणाले की, मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच जाहीर होणार असून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कर्जमाफीचा लाभ खरोखरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचार सभेत ते औसा तालुक्यातील लामजना येथे बोलत होते. यावेळी मंचावर माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर भाजपाचे जिल्हाध्यक्ष व बसवराज पाटील आमदार अभिमन्यू पवार, सभापती चंद्रशेखर सोनवणे, अॅड परीक्षीत पवार आदी सह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री बावनकुळे यांनी गायरान, बंजारा वस्ती व वडार समाजासाठी मोठी घोषणा केली. अभिमन्यू, तुम्ही सर्व गावांची यादी तयार करा. मी एक शासन आदेश काढून गायरानवर, बंजारा वस्तीत किंवा इतर वस्तींमध्ये राहणाऱ्या सर्व कुटुंबांचे कबाले वाटप करून देण्याची जबाबदारी घेतो, असे त्यांनी जाहीर केले. घरकुलासाठी कमाल मर्यादा न मिळालेल्या कुटुंबांनाही न्याय दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.