कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूकीत नवनर्वचित नगरसेवक मधुर म्हात्रे नाँट रिचेबल असल्याने उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बेपत्ता असल्याचे पोस्टर लावण्यात आल्याने बदनामी केल्या प्रकरणी त्यांचे वडील उमेश म्हात्रे यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. यामुळे नाँट रिचेबल मधुर म्हात्रे यांच्या बेपत्ता प्रकरणाला वेगळीच कलटणी मिळाल्याने राजकीय घाडामोडी पाहतख मधुर म्हात्रे आल्यानंतरच त्यांची भूमिका काय ते चित्र स्पष्ट होणार असल्याचे दिसत आहे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले उमेदवार मधुर म्हात्रे निवडून आल्यापासून नाँट रिचेबल आहेत. कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे उबाठा गटाच्या विजयी ११उमेदवारा पैकी मधुर म्हात्रे, किर्ती ढोणे, स्वप्नाली केणे, राहूल कोट हे उमेदवार उपस्थित राहिले नसल्याने, शिवसेना उबाठा वतीने संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काल उबाठा पक्षाच्या पदाधिकारी यांनी याप्रकरणी मिसिंग तक्रार दाखल केली. तर रविवारी कल्याण पूर्वेत मधुर म्हात्रे ,किर्ती ढोणे बेपत्ता असल्याबाबत पोस्टर लावत कोणास आढळल्यास शिवसेना कोळसेवाडी शाखा येथे संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आले.
या घडामोडी पाहता पोस्टर प्रकरणी मधुर म्हात्रे यांच्या नातेवाईकांनी बदनामी होत असल्याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानिमित्ताने प्रसिध्दी माध्यमांना सामारे जाताना मधुर यांचे वडील उमेश म्हात्रे यांनी सांगितले की, निवडून आल्यानंतर नवस फेडण्यासाठी, देव दर्शनासाठी मधुर गेला असून, दरम्यान विश्पनासाठी त्यांचा फोन बंद होता. तो आमच्या संपर्कात असून त्यांचे पोस्टर लावित तो बेपत्ता असल्या प्रकरणी बदनामी केल्या बाबत आम्ही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली असून त्याने पक्ष सोडला नसून तो आल्यानंतरच त्यांची भुमिका कळेल असे सांगितले.