आगामी महापालिका निवडणूकीत महायुती लढणार एकत्र – मुख्यमंत्री

0

पुणे : राज्यात महापालिका निवडणूक लवकरच होणार असून प्रत्येक पक्षाकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आगामी महापालिका निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान अपवादात्मक ठिकाणी वेगळं लढू, मात्र एकेमकांवर टिका टिपण्णी करणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. देवेंद्र फडणवीस हे सध्या पुणे दौऱ्यावर असून पुण्यातील यशदा येथे राज्यातील महापालिका आयुक्त आणि मुख्याधिकाऱ्यांची परिषदेच्या कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांना आगामी माहापालिका निवडणूकी बद्द विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी एकत्रिक निवडणूक करण्याबाबत मत व्यक्त केले.

यावेळी फडणवीस म्हणाले, “आम्हाला महापालिकेच्या निवडणुका या महायुती म्हणून लढवायचे आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र असून अपवादात्मक परिस्थितीत आम्ही काही ठिकाणी वेगळे लढू पण एकेमकांवर टिका न करता पॉझिटिव्ह प्रचार आम्ही करू. शक्यतो जिथे महायुती म्हणून लढता येईल तिथे आम्ही तसे प्रयत्न करणार आहोत.” राज्यात नवीन सरकार आल्यावर आम्ही हा निर्णय घेतला की मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय सुधार झाले पाहिजेत. तसेच प्रशासकीय कार्यक्षमता वाढली पाहिजे या दृष्टीने अधिकाऱ्यांशी संवाद आणि मार्गदर्शन केले जात आहे. याआधी जिल्हाधिकाऱ्यांसोबत कार्यशाळा झाली आणि आज महापालिकेच्या आयुक्तांसोबत संवाद आयोजित करण्यात आला आहे. सरकार म्हणून एक इन्स्टिट्यूट झाले पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे देखील फडणवीस यांनी नमूद केले.

सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्या सूचना केल्या आहेत त्याबाबत मुख्यमंत्री यांना विचारलंफडणवीस म्हणाले, “निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. आम्ही वेळेत या निवडणूक घेण्याचे विचार करू आणि वेळेतच या निवडणूक व्हायला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. “

पाकिस्तानची साथ देण्यासाठी देशभरात बायकॉट तुर्की हा ट्रेंड पाहयला मिळत आहे. दरम्यान पुण्यातील एका व्यापाऱ्याला पाकिस्तानकडून धमकी देखील देण्यात आली आहे. याबाबत फडणवीस म्हणाले, “ज्यांनी बायकॉट केला आहे त्यांचे अभिनंदन करतो. देश प्रथम अशी आमची भूमिका असली पाहिजे. जो देश मानवतेच्या विरोधात आहे आणि त्या देशाला जर कोणी पाठिंबा देत असेल तर त्याला देखील जागा दाखवणे गरजेचे आहे. पहलगाम येथे झालेला हल्ला हा मानवतेवर झालेला हल्ला होता. पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या कारवाईचे चित्र आता न्यूयॉर्क टाईम यांनी सॅटॅलाइट चित्राद्वारे प्रसिद्ध केले आहेत. त्याद्वारे पाकिस्तानचे सत्य बाहेर आले आहे. दरम्यान ज्या व्यापाऱ्यांनी देश प्रथम ही भूमिका स्वीकारली त्यांचे मी अभिनंदन करतो व अशा व्यापाऱ्यांच्या मागे उभे आहोत.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech