मुंबईचे महापौर पदासाठी मकरंद नार्वेकर यांचे नाव आघाडीवर

0

घनश्याम भडेकर

मुंबई : मुंबईचे महापौर कोण होणार याची सर्वत्र चर्चा चालू असतानाच आमच्या दिल्लीतील मित्रांनी भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले. कुलाबा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आलेले मकरंद नार्वेकर हे व्यवसायाने वकील आहेत २०१२ मध्ये ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. मग त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे ते धाकटे बंधू. त्यांची बहीण गौरवी शिवलकर आणि भावाची पत्नी हर्षिता नार्वेकर या भाजपच्या नगरसेविका आहेत. मकरंद यांच्या मातोश्री श्रीमती सुधाताई नार्वेकर या महिला विकास मंडळाच्या पदाधिकारी आहेत.

२०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी स्वतःची सहा कोटींची मालमत्ता असल्याचे जाहीर केले होते. रायगड जिल्ह्यातील अलिबाग परिसरात त्यांनी २७ शेतजमिनी विकत घेतल्या. या जमिनी झिराडपाडा, कीहिम, सासवणे, म्हात्रोळी वाडी आणि मापगाव या गावात आहेत. बाजारभावाप्रमाणे त्यांची एकूण मालमत्ता १२४ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कुलाबा परिसरातील रस्ते दुरुस्ती,काँक्रिटीकरण, पदपथावरील दिव्यांची व्यवस्था, घरोघरी सुलभ पाणीपुरवठा, युवकांसाठी अध्यायावत व्यायामशाळा, झोपडपट्ट्यातील शौचालय आणि स्वच्छता यावर त्यांनी विशेष लक्ष देऊन काम केले आहे. त्यांच्या हसमुख चेहऱ्यामागे महापौर पदाचे सुतोवाच तर नाही ना ?..

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech