मालवणी महोत्सवात रिल्स बनवा…बक्षिस मिळवा !

0

कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने भाजप नगरसेवक सीताराम राणे यांचे आवाहन

ठाणे : कोकण ग्राम विकास मंडळाच्या वतीने भाजप नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकारातून ठाण्यात भव्य मालवणी महोत्सव -२०२६ चे आयोजन येत्या १८ फेब्रुवारी पर्यंत ठाण्याच्या शिवाईनगर, उन्नती गार्डन मैदानातील स्व. अजितदादा पवार महोत्सव नगरीत करण्यात आले आहे. या मालवणी महोत्सवातील क्षण आपल्या मोबाईलमध्ये टीपुन आकर्षक रिल्स बनवा… बक्षिस मिळवा. असे आवाहन कोकण ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष भाजप नगरसेवक सीताराम राणे यांनी केले आहे. येत्या १७ फेब्रुवारीपर्यंतच या स्पर्धेचा कालावधी आहे.

आजकाल तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि रिल्स मेकिंग हा युवावर्गाचा आवडता छंद आहे. सध्या ठाण्यात सुरू असलेल्या मालवणी महोत्सवामध्ये दररोज खवय्यांसह रसिक आणि भाविकांची सांस्कृतिक भूक भागवली जात आहे. या अनुषंगाने आयोजकांनी रिल स्पर्धा आयोजीत केली आहे. प्रथम पारितोषिक २० हजार, द्वितीय १० हजार आणि तृतिय क्रमांकाच्या विजेत्याला ०५ हजार आणि सन्मानचिन्ह प्रदान केले जाणार आहे. ह्या रिल स्पर्धेसाठी आयोजकांनी काही नियम व अटी ठेवल्या आहेत. रिलची वेळ मर्यादा ६० ते ९० सेकंद असावी, स्पर्धेसाठी चित्रित करण्यात येणारी रिल ही १० ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील मालवणी महोत्सवातील असणे आवश्यक असुन इतर कोणतीही रिल ग्राहय धरली जाणार नाही. स्पर्धकाने वरिल कालावधीत वेगवेगळ्या दिवशी किमान ४ रिल बनविणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारची “Paid Boosting” ग्राह्य धरली जाणार नाही. अपलोड करताना रिल @sitaram.rane,@Konkangramvikasmandal ह्यांना टॅग करावे. अधिक माहितीसाठी रोहित देसाई 8097888107 व सिध्देश येद्रे 9699185189 यांना संपर्क साधावा.असे आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केले आहे.

रिल स्पर्धेसाठी विषय
* मालवणी महोत्सव व आयोजनाचा उद्‌देश
* आयोजकांचे उदिष्ट
* लोकसहभाग व महोत्सवाबाबत प्रतिक्रिया

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech