मान्सून अंदमानमध्ये दाखल, आगामी ५ जूनला महाराष्ट्रात हजेरी लावणार

0

मुंबई : मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असून आगामी २७ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर ५ जून रोजी मान्सून कोकणामार्गे महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता आहे. तर १५ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनची वाटचाल यंदा वेगाने सुरू आहे.मान्सून सरासरी वेळेच्या ५ दिवस आधीच अंदमानात दाखल झाला आहे. मान्सूनने दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्राचा काही भाग, निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागापर्यंत वाटचाल केली आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून आणखी काही भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.पुढील तीन ते चार दिवसात दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र; दक्षिण बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भाग मान्सून दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech