रविवारी ठाणे-कल्याण दरम्यान ५-६व्या मार्गिकेवर मेगा ब्लॉक

0

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवार, दि. २१.१२.२०२५ रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक परिचालीत करण्यात येणार आहे. मुख्य मार्गावरील ब्लॉक विभाग ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५ वी आणि ६वी मार्गिकेवर ९.०० ते १३.०० वाजेपर्यंत अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे वळवणे (डायव्हर्जन) खालील अप मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील व त्या गंतव्य स्थानकावर सुमारे १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

11010 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस, 17611नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस, 12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन, 13201 राजगीर – लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस, 17221 काकीनाडा – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 12126 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस, 12140 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस, 22160 चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस, 12168 बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 12321 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल, 12812 हाटिया – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 11014 कोयंबतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

डाऊन मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्जन : खालील डाउन मेल/एक्सप्रेस गाड्या ठाणे व कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील व त्या सुमारे १० ते १५ मिनिटे उशिराने पोहचतील. 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर एक्सप्रेस 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोंडा गोदान एक्सप्रेस, 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर पवन एक्सप्रेस,16345 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस, मेमू (MEMU) गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन / शॉर्ट ओरिजिनेशन, 61003 वसई रोड – दिवा मेमू ०९.५० वाजता वसई रोड येथून सुटणारी मेमू गाडी कोपर येथे १०.३१ वाजता शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल., 61004 दिवा – वसई रोड मेमू ही मेमू गाडी दिवा ऐवजी कोपर येथून ११.४५ वाजता शॉर्ट ओरिजिनेट होऊन वसई रोड येथे १२.३० वाजता पोहोचेल.पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप व डाउन हार्बर मार्गावर (पोर्ट मार्ग वगळून) ११.०५ ते १६.०५ वाजेपर्यंत

हार्बर मार्गावरील सेवा : पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील १०.३३ ते १५.४९ वाजेदरम्यान सुटणाऱ्या सेवा तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील ०९.४५ ते १५.१२ वाजेदरम्यान सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील.

ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा : पनवेल येथून ठाणेकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील ११.०२ ते १५.५३ वाजेदरम्यान सुटणाऱ्या सेवा तसेच ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील १०.०१ ते १५.२० वाजेदरम्यान सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी दरम्यान विशेष लोकल गाड्या चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गावरील सेवा उपलब्ध राहतील. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी व सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक अत्यावश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर असून सहकार्याची विनंती आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech