नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी विमानतळावर उपस्थित असतील याची आम्हाला कल्पना नव्हती. याबद्दलचा अंदाज आम्हाला नव्हता. पंतप्रधान मोदी रशियाच्या अध्यक्षांच्या स्वागताला येतील असं आम्हाला वाटलं नव्हतं. आम्ही याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होतो, असे रशियाचे राष्ट्रपती भवन क्रेमलिनकडून सांगण्यात आले. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात खनिज तेलापासून एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणेपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. यासोबतच दोन्ही देशांमध्ये व्यापार करार देखील होण्याची शक्यता आहे.
गुरुवारी सायंकाळी पुतिन यांचे भारतात दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पालम विमानतळावर मोठ्या उत्साहात स्वागत केले. पुतिन विमानातून बाहेर येताच मोदींनी हस्तांदोलन केले, त्यानंतर दोन्ही नेत्यांनी गळाभेट घेतली. यानंतर दोन्ही नेत्यांनी एकाच कारमधून लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधान निवासस्थानाच्या दिशेनं एकाच गाडीतून प्रवास केला. विशेष बाब म्हणजे व्लादिमीर पुतिन आणि नरेंद्र मोदी यांनी ज्या कारमधून प्रवास केला ती महाराष्ट्र पासिंग कारचा नंबर MH 01 EN 5795 असा आहे. झालेली होती. SUV Toyota फॉर्च्यूनरमधून दोन्ही नेत्यांनी प्रवास केला. तीन महिन्यांपूर्वी शांघाई शिखर संमेलनात मोदी आणि पुतिन यांनी एकाच कारमधून प्रवास केला होता.