सावकारांचे रॅकेट महाराष्ट्रात सक्रिय असून चौकशीची गरज – वडेट्टीवार

0

नागपूर : चंद्रपूर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी सावकाराकडून फक्त एक लाख घेतले होते पण त्यावरील व्याज वाढून ते ७४ लाख झाले. त्याची किडनी विकण्यात आली. असे शेतकऱ्यांना धमकावून किडनी विकणारे मोठे रॅकेट महाराष्ट्रात सक्रिय असून याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. चंद्रपूर येथील शेतकरी रोशन कुडे याची कंबोडिया मध्ये किडनी विकल्यावर तो व्हिएनतियान इथल्या कॉल सेंटर मध्ये काम करत होता. तिथे त्याला मारहाण होऊन पासपोर्ट काढून घेतला होता.जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्याला सुरक्षित भारतात काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आणले. या प्रकरणात पाच वेळा चंद्रपूर पोलिस अधीक्षक यांना फोन करून कारवाईची मागणी केल्याचे वडेट्टीवार यांनी आज नागपुरात माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

सरकारने आज SIT नेमली तरी ते पुरेस नाही. शेतकऱ्यांना त्रास देऊन पैसे लुबाडणारे सावकारांचे रॅकेट आहे. विदर्भ आणि मरावाड्यात जिल्हा जिल्ह्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे नेतृत्वाखाली टीम करून हे रॅकेट पकडले पाहिजे. राज्यात शेतकऱ्यांना किडनी विकण्याची वेळ महायुती सरकारने आणली हे सरकार शेतकऱ्यांना उद्भवत करणारे आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. किडनी विकणारे रॅकेट सोशल मीडियाच्या माध्यमातून ही सक्रिय असू शकतं. यात डॉक्टर, एजंट असू शकतात याची चौकशी झाली पाहिजे,जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

राज्यात आज नगरपरिषदेचे मतदान होत असले तरी अनेक ठिकाणी पैशाचे आमिष मतदारांना दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. निवडणूक आयोग हा भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. घुघुग्स निवडणुकीत पाच हजार रुपयाची पाकीट वाटण्यात आली तर त्र्यंबकेश्वर येथील निवडणुकीत ५० हजार रुपये एका मताला देण्यात आले कारण कुंभ येत आहे तिथे सत्ता हवी आहे. हे सगळ होत असताना निवडणूक आयोग झोपून आहे,काहीही कारवाई करत नाही म्हणून आयोग भाजपची बी टीम असल्याचा आरोप वडेट्टीवर यांनी केला.

भाजपला उद्याच्या निवडणूक निकालात यश मिळेल असा आत्मविश्वास हा बोगस मतदान आणि पैशाच्या जोरावरच आहे, अस वडेट्टीवार म्हणाले. सदोष मतदार यादी असून याबाबत वारंवार तक्रार करूनही निवडणूक आयोग काहीही करत नाही. भाजपने निकालाची वाट न बघता गुलाल उधळला पाहिजे असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech