मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्शवभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जात आहे.याचाच एक भाग म्हणून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव आज, रविवारी पासून भाविकांना हार आणि नारळ अर्पण करण्यास मनाई केली आहे.हा नियम आजपासून लागू होणार असल्याची माहिती न्यासाच्या वतीने देण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे, त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे.