वैष्णवी हगवणे आत्महत्या – फरार आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक

0

काठमांडू : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून निलेश हा फरार होता. त्यानंतर अखेर आज(दि. ३०) पोलिसांना निलेश चव्हाण याला पकडण्यात यश आलं आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाणचा समावेश होता. यामुळे वैष्णवी आणि तिच्या सासरच्यांना अटक केल्यानंतर निलेश चव्हाणलाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी सहा पथकं तयार केली होती. ज्यात विशेष पथकांचाही समावेश होता. आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील शोधमोहीम राबवली होती. तो दुसऱ्या राज्यात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु, तो नेपाळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर आज(दि.३०) अखेर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी तात्काळ त्याला अटक केली आहे. लवकरच त्याला पिंपरी- चिंचवडमध्ये आणले जाणार आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाण याच्याकडे वैष्णवीचे बाळ ठेवण्यात आलेले होते. वैष्णवीचे कुटुंबीय हे बाळ आणण्यासाठी गेल्यावर निलेश याने त्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावले होते. तसंच बाळाला देण्यास नकार दिला होता, असं वैष्णवीच्या कुटुंबाने आरोप केलेले आहेत. त्याचबरोबर निलेश चव्हाण स्वत:च्या पत्नीचे अश्लील व्हिडीओ बनवल्या प्रकरणी देखील गुन्हा दाखल आहे. त्याच्या लॅपटॉपमध्ये पोलिसांना अनेक आक्षेपहार्य गोष्टी आढळून आल्या आहेत.

निलेशच्या अटकेनंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. त्याच्या जबाबातून संपूर्ण कटकारस्थानाचा उलगडा होऊ शकतो. पोलिसांनी या प्रकरणात तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुराव्यांचा वापर करत तपास अधिक गतीने पुढे नेला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech