स्वामी विवेकानंद दत्तनगर माध्यमिक द्वितीय
कल्याण : आप्पासाहेब शिंदे क्रीडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून १६ डिसेंबर रोजी आप्पासाहेब शिंदे ठाणे जिल्हास्तरीय आंतरशालेय लेझीम स्पर्धा २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संस्थेचे अध्यक्ष विक्रांत शिंदे व कल्याण मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व सम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्याहस्ते संपन्न झाला. सचिव अविनाश नलावडे यांनी लेझीम स्पर्धा आयोजनाचा हेतू प्रास्ताविकेतून स्पष्ट केला. लेझीम हा महाराष्ट्राचा पारंपारिक मर्दानी खेळ असून या खेळातील विविध व्यायाम प्रकारातून शारीरिक सुदृढता वाढते, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
लेझीम स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सेवानिवृत्त तज्ज्ञ क्रीडा शिक्षक ॲड. अनिल बनसोडे, मावळी मंडळ हायस्कूलचे तज्ज्ञ क्रीडा शिक्षक ॲड. प्रमोद वाघमोडे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेतील तज्ज्ञ क्रीडा शिक्षिका प्रिया पेंडुलकर हे उपस्थित होते.
बक्षीस वितरण सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सैनिकी विद्यालय खडवली येथील कमांडंट शंकरराव यादव (रि. कर्नल ), अध्यक्ष विक्रांत शिंदे, एन.आर.सी. इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक संजय मेहता, मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका नेहा खेडेकर, सम्राट अशोक प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापिका सुजाता नलावडे, तिसाई विद्यालयाच्या निर्मला वाघ, आप्पासाहेब शिंदे क्रीडा प्रतिष्ठानचे सदस्य संतोष सावंत, योगेश सावंत, कमलेश ठाकरे, राजेंद्र लिंगायत आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विक्रांत शिंदे यांनी सर्व लेझीमपटू, शिक्षक व मुख्याध्यापक यांचे कौतुक केले आणि प्रत्येक वर्षी ठाणे जिल्हास्तरीय आंतरशालेय लेझीम स्पर्धा घेतली जाणार असे घोषित केले. लेझीम स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नंदलाल पवार, उदय नाईक, प्रवीण खाडे, मुकुंद गायधनी, संजय काळे, अविनाश ओंबासे, सुभाष मते, राजेश मानवडे, दीपक माने, सुनील भुसारे, सुदर्शन प्रश्न, चन्ने, अंकुर आहेर व स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. लेझीम स्पर्धेसाठी क्रीडांगण तयार करण्यासाठी जय जिजाऊ क्रीडा मंडळाच्या खेळाडूंनी विशेष मेहनत घेतली.
स्पर्धेत विविध शाळांच्या माध्यमातून सुमारे ८५० लेझीमपटूंनी सहभाग घेतला. सर्व सहभागी शाळांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी २० लेझीम व प्रत्येक सहभागी लेझीमपटूंना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रवीण खाडे यांनी केले.