कांद्याचे भाव गडगडले, शेतकरी आर्थिक संकटात, उत्पादन खर्च वसूल होणे अवघड

0

लासलगाव : राज्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले असले तरी बाजारात कांद्याच्या दराने तळ गाठला आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये सरासरी प्रतिक्विंटल ६०० ते १००० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यावर – कर्जाचा डोंगर वाढत आहे. नैसर्गिक आपत्तीतून वाचलेला – खरीप व लेट खरिपातील लाल कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर कमी असल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. महागडे बियाणे, खते, औषधे, मजुरी, पाणी – आणि वाहतूक खर्च प्रचंड वाढला – असताना कांद्याला अत्यल्प दर मिळत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या पदरी तोटा पडत आहे. कांदा पिकवायचा की नाही, असा प्रश्न आता पडू लागला आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

कांदा नगदी पीक मानले जात असले तरी सध्याच्या परिस्थितीत ते शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरत आहे. कांद्याला एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च येत आहे. यंदा पावसामुळे कांदा लागवडीचे नियोजन कोलमडले असून, रोपे सडण्यापासून ते कीड रोगांपर्यंत अनेक संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागला. मात्र आता कांदा बाजारात विक्रीसाठी आल्यावर मिळणाऱ्या दरामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आहे. कांद्याच्या भावातील ही घसरण केवळ शेतकऱ्यांच्याच नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा आहे. शासनाने वेळीच पावले उचलली नाही, तर परिस्थिती अजून घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कांद्याच्या घसरलेल्या आर्थिक अडचणीत येत आहे. शासनाने लवकरात लवकर कांदा दरामध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. – ऋषिकेश थेटे, युवा प्रगतिशील शेतकरी एकीकडे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढ-लेला असताना सध्या बाजारात सरासरी ७०० ते १००० रुपये दर हा तोट्याचा ठरत आहे. शेतकरी राजा कर्जबाजारी होत आहे.
– बापू मोरे, प्रगतिशील शेतकरी

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech