‘ऑपरेशन सिंदूर’ अजून संपलेले नाही- राजनाथ सिंह

0

भुज : ‘ऑपरेशन सिंदूर’ अजून संपलेले नाही. हा फक्त ट्रेलर होता, वेळ आल्यावर जगाला संपूर्ण पिक्चर दाखवू असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. गुजरातच्या भुज एअर बेसवर जाऊन जवानांचे कौतुक करताना राजनाथ सिंह बोलत होते. याप्रसंगी संरक्षण मंत्री म्हणाले की, भारतीय हवाई दलाची पोहोच पाकिस्तानच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भारतीय विमाने सीमा न ओलांडता पाकिस्तानच्या प्रत्येक कोपऱ्यात मारा करण्यास सक्षम आहेत. भारतीय वायुसेनेने कशा पद्धतीने पाकिस्तानात ९ ठिकाणी हल्ला केला हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. ‘जितक्या वेळेत एखादा माणूस नाश्ता करतो तितक्या वेळेत वायुसेनेने शत्रुला टार्गेट केले आहे. भारतीय हवाई दलाने अवघ्या २३ मिनीटात पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ तळं उध्वस्त केलीत.

ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय वायुसेनेने केलेल्या कारवाईचा सर्व भारतीयांना अभिमान असल्याचे राजनाथ यांनी सांगितले. भारतीय वायुसेनेच्या हल्ल्यात पाकिस्तानातील नष्ट झालेले दहशतवाद्यांचे अड्डे आणि नेटवर्क पुन्हा उभारण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तान सरकारने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला १४ कोटी रुपयांची मदत करणार असल्याचे राजनाथ यांनी सांगितले. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना कशी मदत दिली जात आहे, याकडे राजनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) लक्ष वेधले. तसेच आयएमएफच्या मदतीचा वापर करून दहशतवाद्यांना पाकिस्तान कशा पद्धतीने पायाभूत सुविधा देतोय यावर देखील संरक्षण मंत्र्यांनी भाष्य केले.

“मुरिदके येथील लश्कर-ए-तोयबाचे आणि बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. ते पुन्हा बांधण्यासाठी आर्थिक मदत करण्याची घोषणा पाकिस्तान सरकारने केली आहे. आंतरराष्ट्रीय निधीकडून येणाऱ्या एक बिलियन डॉलर्सच्या (८५०० कोटी रुपये) मदतीपैकी काही पैसा दहशतवाद्यांचे अड्डे बांधण्यासाठी वापरले जाणार आहे. मग ही आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून अप्रत्यक्षपणे दहशतवाद्यांना मदत नाही का..? असा सवाल राजनाथ सिंह यांनी आयएमएफला केला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech