पुणे : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पुणेपोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवाणी हिच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात १८८६ पानांचे विस्तृत दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांची नावे आरोपपत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांना दिलासा मिळाला आहे. या जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी यांच्यावरच आरोपांचे ठपके ठेवण्यात आले आहेत. आर्थिक गुन्हे विभागाच्या दोषारोप पत्रामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांचे नाव नाहीये. त्यामुळे दोघांनाही दिलासा मिळाला आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशातच या मुंढवा गैरव्हवहार प्रकरणात पोलिसांच्या चार्जशीटमध्ये त्यांचे नाव न आल्याने पार्थ यांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात पार्थ पवारांवर आणि दिग्विजय सिंह पाटील यांच्यावर आरोप करण्यात आले होते. मात्र आता त्या दोघांना मोठा दिलासा मिळाला आहे, या जमीन प्रकरणी फक्त शितल तेजवानी विरोधात आरोप ठेवण्यात आले असल्याचे चार्जशीट मध्ये दिसून आले आहे.