विमान अपघाताची सुमोटो दखल घेऊन नुकसानभरपाईचे निर्देश द्यावेत

0

डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून केली मागणी

नवी दिल्ली : गुजरातमध्ये गुरुवारी झालेल्या विमान अपघाताची सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो (स्वतःहून) दाखल घ्यावी आणि अपघातग्रस्तांना नुकसानईभरापाई मिळावी यासाठी केंद्र सरकारला निर्देश द्यावे अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलीय. डॉ. सौरव कुमार आणि डॉ. ध्रुव चान यांनी ऍड्. सत्यम सिंह राजपूत यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.

न्यायालयाने केंद्र सरकारला अपघातातील पीडितांना (विमानातील लोक तसेच बी. जे. मेडिकल कॉलेजचे निवासी डॉक्टर) ५० लाख रुपयांची अंतरिम भरपाई देण्याचे निर्देश द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या अपघाताबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश द्यावेत. या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालय/उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, विमान वाहतूक तज्ञ, विमा आणि आर्थिक बाबींचे तज्ञ यांचा समावेश असावा जेणेकरून नुकसानभरपाईची रक्कम योग्यरित्या निश्चित होईल. न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना अपघाताच्या कारणाची सविस्तर चौकशी करण्याचे आणि असे अपघात पुन्हा घडू नयेत, यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेत केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech